Budh Gochar 2023 in Kanya: बुध ग्रहाला बुद्धी, व्यापार, वाणी व धनाचा कारक मानले जाते. जेव्हा बुध गोचर होते तेव्हा त्याचा प्रभाव कमी-अधिक, शुभ-अशुभ स्वरूपात प्रत्येक राशीवर दिसून येतो. जेव्हा बुध उच्च राशीत असतो तेव्हा त्याचा फायदा विशेषतः व्यवसाय, व्यापार व गुंतवणूक अशा माध्यमातून समोर येतो. अलीकडेच कन्या राशीत बुध ग्रहाचे गोचर झाले आहे. १ ऑक्टोबर २०२३ ला बुधाने गोचर करून कन्या राशीत प्रवेश केला होता. वैदिक ज्योतिषशास्त्र अभ्यासकांनुसार, १९ ऑक्टोबर पर्यंत बुध कन्या राशीतच राहणार आहे. यामुळे ३ राशींना १९ ऑक्टोबर पर्यंत कालावधी अत्यंत धनलाभाचा व सुखाचा असणार असल्याचे दिसतेय. तुमची रास यात आहे का व असल्यास तुम्हाला नेमका काय व कसा लाभ होणार हे पाहूया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१९ ऑक्टोबर पर्यंत सोनेरी दिन ! बुध गोचराने पालटतील तुमचे दिवस

वृषभ रास (Taurus Zodiac Horoscope)

बुध गोचर वृषभ राशीच्या मंडळींसाठी अत्यंत लाभदायक असू शकते. या मंडळींच्या कुंडलीत बदलाचे संकेत आहेत. तुमची आर्थिक स्थिती सुद्धा बदलण्यामागे नोकरीत किंवा व्यवसायात बदल होणार असल्याचे दिसत आहे. तुम्हाला पूर्णपणे तुमच्या कार्याची कक्षा व मार्ग बदलता येणार आहे. तुमच्या कामाचे प्रचंड कौतुक होऊ शकते. गुंतवणुकीतून फायदा आहे पण मार्ग विश्वासाचा निवडा. तुम्ही कुटुंबासह काही खास क्षण अनुभवू शकता, त्यामुळे मन आनंदी व मूड फ्रेश राहील.

सिंह रास (Leo Zodiac Horoscope)

सिंह राशीच्या मंडळींसाठी बुध गोचर सोन्याचे दिवस घेऊन येत आहे. या मंडळींना दागदागिने खरेदी करायची संधी मिळू शकते. तुमची आवक वाढू शकते. पण तितकाच खर्च सुद्धा वाढताना दिसत आहे. खर्च करताना मनात दुःख ठेवू नका अन्यथा तुम्ही करत असलेली खरेदी तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार नाही. मन शांत ठेवून निर्णय घ्या. मेंदूच्या जोडीने मनाला या काळात अधिक प्राधान्य देणे फायद्याचे ठरू शकते. तुम्हाला १९ ऑक्टोबरच्या आधीच एखाद्या मोठ्या स्वप्नाची पूर्ती करता येऊ शकते.

हे ही वाचा<< २०२४ आधी मोदी, गांधी, कुमार, बॅनर्जी यांचे कष्ट वाढवणार ‘राहू’! ज्योतिषांनी मांडली १० मोठ्या नेत्यांची कुंडली

वृश्चिक रास (Scorpio Zodiac Horoscope)

बुध गोचर वृश्चिक राशीच्या मंडळींसाठी आर्थिक मिळकत वाढवणारे माध्यम ठरणार आहे. मुख्य म्हणजे तुम्ही कमावलेले पैसा चैनीसह गुंतवणूक व बचतीसाठीही वापरता येईल इतक्या मोठ्या प्रमाणात असू शकतो. एखाद्या यात्रेला जाण्याची संधी मिळू शकते. अनेक गोष्टी अचानक ठरतील- घडतील यामुळं तुमच्या आयुष्यला गती मिळू शकते. अनेक दिवसांपासून सुरु असणारी मरगळ निघून जाईल.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Till 19th october budh becomes extreme powerful in kanya rashi these three rashi to earn more money investment job luck svs