Angarak Yog in Pisces: ग्रहांचे सेनापती मंगळ ग्रहाने आज २३ एप्रिलला सकाळी ८ वाजून २० मिनिटांनी गुरुच्या मीन राशीत प्रवेश केला आहे. १ जून २०२४ पर्यंत मंगळ मीन राशीत कायम असणार आहे. भूमिपुत्र मंगळ जेव्हा राशी किंवा नक्षत्र परिवर्तन करतो तेव्हा त्याचा प्रभाव प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात महत्त्वपूर्ण बदल घडवून आणतो. महत्त्वाची बाब म्हणजे मीन राशीत अगोदरच राहू ग्रह स्थिर आहे. राहू व मंगळाच्या युतीने महाविस्फोट अंगारक योग निर्माण होत आहे. मुळात हा योग फार शुभ मानला जात नाही पण हा योग जेव्हा मीन राशीत तयार होतोय तेव्हा बुधाचे रेवती नक्षत्र जागृत असणार आहे. या नक्षत्राच्या शुभ प्रभावामुळे हा अशुभ योग सुद्धा काही राशींच्या कुंडलीत प्रगती व लाभाचे संकेत घेऊन आला आहे. या नशीबवान राशी कोणत्या व त्यांना काय लाभ होऊ शकतो हे पाहूया..
अंगारक योग ‘या’ राशींचा भाग्योदय घडवणार; तुम्हीही आहात का नशीबवान?
कर्क रास (Cancer Rashi Bhavishya)
आपल्या राशीच्या गोचर कुंडलीत नवव्या स्थानी मंगळ विराजमान असणार आहे. अंगारक योग आपल्या राशीला प्रचंड ऊर्जा देऊन जाणार आहे. अतिउत्साही निर्णय घेऊ नका. उच्च शिक्षणाची इच्छा पूर्ण होऊ शकते. धार्मिक कामाच्या निमित्ताने कुटुंबासह चांगला वेळ घालवू शकता. १९ ते २१ मे या कालावधीत सावध राहून काम करा, बोलण्यावर नियंत्रण ठेवा. लहानसहान गोष्टींवर चिडणं, रागावणं टाळावं . या कालावधीत तुमच्या अडकून पडलेल्या कामांना गती लाभणार आहे परिणामी अडकून पडलेले धन सुद्धा तुमच्यापर्यंत वेगाने पोहोचू शकेल. लाभ मिळवण्यासाठी अंगारक योगाची तीव्रता व रेवती नक्षत्राचा शुभ प्रभाव अशी दुहेरी शक्ती कामी येईल.
वृश्चिक रास (Scorpio Rashi Bhavishya)
मंगळ आपल्या राशीत पाचव्या स्थानी स्थिर आहे. अंगारक योग आपल्या राशीला लाभदायक ठरणार आहे. परदेशी कामाची संधी मिळू शकते. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा कालावधी शुभ सिद्ध ठरू शकतो. उच्च शिक्षण किंवा करिअरसाठी परदेशात जाऊ शकता. व्यवसाय वृद्धी होऊन आपल्या कामाच्या व परिणामी आर्थिक लाभाच्या कक्षा रुंदावू शकतात. प्रेमसंबंधांना यश मिळू शकते. विवाहाचे योग आहेत. भागीदारीत केलेल्या कामामुळे आर्थिक फायदा होऊ शकतो.
हे ही वाचा<< हनुमान जयंतीला मारुतीराया मेष ते मीनपैकी कुणाला देणार आर्थिक बळ; तुमच्या राशीच्या नशिबात आज काय घडेल?
मकर रास (Capricorn Rashi Bhavishya)
मकर राशीच्या कुंडलीत मंगळ तिसऱ्या स्थानी स्थिर असणार आहे व मंगळाची दृष्टी सहाव्या, नवव्या व दहाव्या स्थानी असणार आहे. अंगारक योग हा आपला आत्मविश्वास वाढवू शकतो. मंगळाच्या दृष्टीमुळे आपल्याला साहसी वृत्तीने पराक्रम गाजवण्याची संधी मिळू शकते. इतरांच्या बोलण्याला भुलू नका, कुणाच्या प्रभावाखाली येऊन तुमच्या आयुष्याबाबतचे निर्णय घेऊ नका. कामाच्या ठिकाणी तुमची मूल्य वाखाणली जातील. तुमच्या कष्टाला पगारवाढ किंवा पदोन्नतीच्या रूपात प्रोत्साहन मिळू शकते. प्रवासाचे योग आहेत. वाहन चालवताना काळजी घ्या.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)