Shani Rahu Nakshatra Gochar: राहू सध्या गुरूच्या घरात म्हणजेच मीन राशीत व पूर्वाभाद्रपद नक्षत्रात विराजमान आहे. ८ जुलैला म्हणजेच पुढील तीन दिवसांनी शनीच्या नक्षत्रात म्हणजेच उत्तराभाद्रपद नक्षत्रात राहू प्रवेश करणार आहे. १६ मार्च २०२५ पर्यंत राहू शनीच्या नक्षत्रात भ्रमण कारणात आहे. राहू हा मुळात शनी प्रमाणेच काम करतो म्हणूनच ‘शनिवत राहू’ असे विशेषण वापरले जाते. असं असलं तरी राहू हा आनंद पसरवणारा ग्रह म्हणून ओळखला जातो, त्यामुळेच राहू ज्या नक्षत्रात जातो, ज्या राशीत प्रभावी असतो तिथे सकारात्मकता पसरवतो, आनंदी वातावरण निर्माण करतो. ज्या राशींच्या कुंडलीत शनीच्या या नक्षत्राचा प्रभाव आहे त्या नक्षत्राला येत्या काळात आनंदी आनंद अनुभवता येणार आहे. राहूच्या शनीच्या नक्षत्रातील वास्तव्यामुळे एक दोन नव्हे तर तब्बल ८ राशींच्या नशिबाला कलाटणी मिळणार आहे. तुमची रास या नशीबवान राशींच्या यादीत आहे का हे पाहूया..

राहू शनीच्या नक्षत्रात येताच ‘या’ ८ राशींचे नशीब उजळणार, लाभणार धन

मेष रास (Aries Rashi Bhavishya)

राहूने शनीच्या नक्षत्रात प्रवेश मेष राशीला कर्मानुरूप फळ मिळणार आहे. तुम्हाला या कालावधीत स्वतःवर खर्च करावा लागणार आहे. आपल्याला आपले कौशल्य वाढवण्यासाठी, नव्या गोष्टी शिकण्यासाठी वेळ व पैशांची गुंतवणूक करावी लागणार आहे. नोकरदार मंडळींना कंपनीच्या कामासाठी प्रवास करावा लागू शकतो. धावपळ वाढेल पण प्रवासात नव्या गोष्टींचे अनुभव घेता येऊ शकतात. नवे संपर्क जोडता येतील ज्यातून तुम्हाला भविष्यात मोठा फायदा होऊ शकतो. सुख प्राप्तीसाठी खर्च करावा लागेल.

Guru planet transit 2025
नुसता पैसाच पैसा! २०२५ मध्ये गुरू करणार तीन वेळा राशीपरिवर्तन; ‘या’ ३ राशीच्या व्यक्तींना मिळणार धनसंपत्तीचे सुख
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Daily Horoscope On 30 October
३० ऑक्टोबर पंचांग: दिवाळीआधीच येईल सोनेरी संधी, आर्थिक बळ वाढेल; कसा जाईल १२ राशींचा बुधवार?
Zee Marathi Awards 2024 full Winners List Part 1 and Part 2
Zee Marathi Awards : यंदाची सर्वोत्कृष्ट मालिका ठरली ‘पारू’! तर, लोकप्रिय नायक-नायिका आहेत…; वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
lucky rashi
गुरु आणि शुक्राच्या युतीमुळे मालामाल होतील मिथुन, सिंहसह या पाच राशी, जाणून घ्या साप्ताहिक भाग्यशाली राशी
Shani Gochar 2025
शनीदेव देणार बक्कळ पैसा; २०२५ मध्ये ‘या’ तीन राशी कमावणार पैसा, प्रेम आणि प्रतिष्ठा
After 30 years Saturn-Venus alliance will happen
३० वर्षांनतर शनी-शुक्राची होणार युती! २०२५ मध्ये ‘या’ राशींची होणार चांदी, मिळणार अपार पैसा
Vinayak Chaturthi special 5th November Rashi Bhavishya
५ नोव्हेंबर पंचांग: विनायक चतुर्थीला ‘या’ राशींना होणार फायदा, भाग्याची साथ ते धनलाभाचे योग; वाचा तुमच्या नशिबात कसं येईल सुख?

वृषभ रास (Taurus Rashi Bhavishya)

वृषभ राशीच्या मंडळींना आर्थिक मिळकतीचे वेगळे स्रोत लाभतील. जर आता काही कारणाने तुमची मिळकत थांबली असेल तर तुम्हाला येत्या काळात रोजगाराची नवी संधी मिळू शकते. तरुणांना योग्यतेनुसार काम लाभू शकते. सहलीचे नियोजन होऊ शकते.

मिथुन रास (Gemini Rashi Bhavishya)

मिथुन राशीच्या मंडळींना कठोर परिश्रमाचे गोड फळ मिळू शकते. नशिबाला लागलेले टाळे उघडू शकते ज्यामुळे मेहनतीला पर्याय नाही हे नीट जाणून घ्या. जर तुम्ही व्यवसायाची सुरुवात करू इच्छित असाल किंवा गुंवतणूक करू इच्छित असाल तर हा कालावधी तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकतो. गुंतवणुकीतून आर्थिक फायदे होणार आहेत.

तूळ रास (Libra Rashi Bhavishya)

८ जुलैनंतर तूळ राशीच्या विद्यार्थी वर्गाला प्रचंड फायदा होऊ शकतो. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळू शकते. मेहनतीच्या शक्तीमुळे नशिबाचे दार उघडेल. नोकरदार मंडळींना पदोन्नतीचा योग आहेत. विचारपूर्वक निर्णय घ्या. शेअर बाजारात गुंतवणूक फायद्याची ठरेल पण घाईने निर्णय घेणे टाळावे.

वृश्चिक रास (Scorpio Rashi Bhavishya)

तुम्ही तुमच्या आवडीची निवड करू शकणार आहात. येत्या कालावधीत राजकारणात कार्यरत असलेल्या व्यक्तीला मोठा फायदा होऊ शकतो. संभाषण कौशल्यावर थोडी मेहनत घेतल्यास वाणीच्या बळावर आपण खूप प्रगती करू शकता. वरिष्ठांचे मन वळवण्यास आपल्याला यश प्राप्त होऊ शकते. नव्या जबाबदाऱ्यांसह आपल्याला धनप्राप्ती होऊ शकते.

मकर रास (Capricorn Rashi Bhavishya)

आर्थिक दृष्टीने हा कालावधी आपल्यासाठी फायद्याचा ठरू शकते. अडकून पडलेले पैसे न मागता परत मिळू शकतात. प्रयत्न केल्यास आपल्याला नियमित कामातून मोकळीक मिळून तुमच्या आवडीचे काम करता येईल. करिअरमध्ये मोठा बदल घडू शकतो. प्रवासाचे योग आहेत.

कुंभ रास (Aquarius Rashi Bhavishya)

आपल्याला येत्या कालावधीत योग्य संगत निवडणे खूप फायद्याचे असेल. इतरांचा आदर ठेवा पण आपल्यासाठी योग्य निर्णय घेताना घाबरू नका. तुम्हाला अय कालावधीत तुमच्या व्यक्तिमत्वाला वेगळी झळाळी देण्याची संधी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी आळस टाळावा. काही कठोर निर्णय घ्यावे लागतील पण त्याचा परिणाम आपल्यासाठी खूप फायद्याचा असू शकतो. पगारवाढ प्राप्त होऊ शकते.

हे ही वाचा<< ५ जुलै पंचांग: आर्द्रा नक्षत्रात आज सुखाच्या सरी बरसणार? ‘या’ राशींचा दिवस आनंदाने होईल सुरु, अमावस्या विशेष राशी भविष्य वाचा

मीन रास (Pisces Rashi Bhavishya)

मीन राशीच्या मंडळींना कामाकडे पूर्ण लक्ष द्या. तुम्हाला वरिष्ठांसह सहकाऱ्यांचे सुद्धा मन राखून काम करावे लागणार आहे. घरगुती कामांकडे व जोडीदारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करू नका. प्रेमाच्या नात्यांसाठी संयम बाळगावा लागेल. पती- पत्नीच्या मदतीने किंवा भागीदारीत केलेल्या कामांमुळे आपल्या धनलाभ होऊ शकतो.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Story img Loader