Shani Transit 2023: न्यायदेवता शनी महाराज शनिवारी ४ नोव्हेंबरला दुपारी १२ वाजून ३५ मिनिटांनी मार्गी झाले आहेत. २९ जून २०२३ पर्यंत शनी याचा मार्गी स्थितीत म्हणजेच १८० अंशात परिक्रमण करणार आहेत. शनी स्वतःच्याच राशीत म्हणजेच कुंभ मध्ये भ्रमण करत असले तरी त्यांचा प्रभाव हा १२ राशींवर कमी अधिक प्रमाणात शुभ- अशुभ स्वरूपात दिसून येऊ शकतो. वैदिक ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार शनी मार्गी झाल्याने आता १२ पैकी काही राशींना शनीच्या साडेसाती व धैय्या (अडीच वर्षांचा प्रभावी काळ) च्या कठीण टप्प्यातून मुक्ती मिळू शकते.
शनी हा ग्रहमालेतील सर्वात संथ गतीने चालणारा ग्रह आहे. त्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी तब्बल साडे सात वर्षांचा कालावधी लागतो. हा कालावधी शनीची साडेसाती म्हणून ओळखला जाणतो. भ्रमण करताना शनीच्या स्थितीनुसार साडेसातीचे सुद्धा कठीण, मध्यम व सोपे असे टप्पे असतात. त्यातील कठीण टप्पा आता काही राशींच्या कुंडलीत संपुष्टात येत आहे. या राशींना येत्या काळात आर्थिक, सामाजिक, आरोग्य व वैवाहिक आयुष्यात काही बदल अनुभवता येऊ शकतात. या राशी कोणत्या हे पाहूया..
शनी धैय्या प्रभाव ‘या’ राशीतून कमी होणार
कुंभ राशीत शनी मार्गी झाल्याने कर्क व वृश्चिक राशीत धैय्याचा प्रभाव कमी होणार आहे. शनी आता कर्क राशीत आठव्या स्थानी तर वृश्चिक राशीत चतुर्थ स्थानी भ्रमण करत असल्यामुळे त्यांना येत्या काळात कर्माचे फळ अधिक वेगाने व जास्त प्रमाणात मिळू शकते. तुमच्या आयुष्यातील ताणतणावातून मुक्ती मिळू शकते. यामुळे विशेषतः व्यावसायिकांना आर्थिक लाभ होऊ शकतो. तुमचा लहानसा व्यवसाय असेल किंवा सुरु करायचा असेल तरी हा कालावधी लाभदायक ठरू शकतो. शेअर मार्केट किंवा सरकारी व बँकेच्या योजनांमध्ये पैसे गुंतवण्याचा प्रयत्न करा. तज्ज्ञांचा सल्ला घ्या. वाडवडिलांच्या संपत्तीवरून काही प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागू शकतो पण त्याचा लाभ सुद्धा प्रचंड होऊ शकतो.
२२ की २३ नोव्हेंबर, कार्तिकी एकादशी कधी? देवउठनी नंतर ‘या’ तिथीपासून सुरु होणार शुभ मुहूर्त
शनीच्या साडेसातीचा प्रभाव ‘या’ राशीतून होणार कमी
मीन राशीतुन शनीच्या साडेसातीचा कष्टमय टप्पा कमी होणार आहे. तर मकर व कुंभ राशीत शनीच्या साडेसातीचा अनुक्रमे दुसरा व तिसरा टप्पा सुरु आहे. तरीही शनी मार्गी झाल्याने मकर, कुंभ, मीन राशीच्या मंडळींची मानसिक त्रासातून सुटका होऊ शकते. शनी वक्री असताना आपल्या राशीला प्रचंड त्रास सहन करावे लागले होते मात्र आता आपल्या राशीसाठी सुखाचा कालावधी सुरु होणार आहे. २०२४ जूनपर्यंत आपल्याला उत्साह व ऊर्जेमुळे कामाचा वेग वाढवता येईल यामुळे होणारी आर्थिक मिळकत सुद्धा वाढल्याने कोट्याधीश होण्याची सुद्धा संधी आहे. वैवाहिक आयुष्यात सुद्धा प्रेम व आदर वाढणवणारी एखादी घटना घडू शकते.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)