Guru Vakri Effect On Zodiac Sign: जेव्हा कोणताही ग्रह वक्री किंवा मार्गी होतो तेव्हा त्याचा कमी-अधिक, शुभ-अशुभ प्रभाव १२ राशींवर होत असतो. मागील महिन्यात म्हणजेच ४ सप्टेंबरला गुरुदेव मेष राशीत वक्री झाले आहेत वैदिक ज्योतिषशास्त्र अभ्यासकांच्या माहितीनुसार, या वर्षाच्या शेवटच्या तीन महिन्यात गुरुदेव काही राशींचे भाग्य पूर्णतः बदलणार आहेत. ज्योतिष अभ्यासक सांगतात की, ३१ डिसेंबर पर्यंत गुरु देव मेष राशीत वक्री अवस्थेत कायम राहणार आहेत. गुरु हे धनु व मीन राशीचे स्वामी आहेत. पण मेष मध्ये असल्याने त्यांचा शुभ प्रभाव काही अन्य राशींवर सुद्धा दिसून येऊ शकतो. या राशी कोणत्या व त्यांना ३१ डिसेंबरपर्यंत नेमका काय व कसा लाभ होऊ शकतो हे जाणून घेऊया..
३१ डिसेंबरपर्यंत ‘या’ ३ राशींवर गुरुदेव करतील धनवर्षाव
मेष रास (Aries Rashi Bhavishya)
गुरु देव मेष राशीतच वक्री असल्याने साहजिकच त्याचा सर्वाधिक प्रभाव हा याच राशीत दिसून येणार आहे. या काळात गुरु मेष राशीच्या मंडळींना कृपाशिर्वाद देऊन धनवान करू शकतात. तुम्हाला कामाचा वेग प्रचंड वाढवावा लागेल पण ज्या वेगाने व अचूकतेने तुम्ही काम कराल त्याच्या दुप्पटीने धनलाभ होण्याची चिनेह आहेत. नोकरी व व्यवसायात प्रगतीचे योग आहेत. जर तुम्ही विवाहच्छुक असाल तर तुम्हाला साजेसे स्थळ सांगून येऊ शकते. तुम्हाला जोडीदाराच्या रूपात माता लक्ष्मीची कृपा लाभू शकते.
सिंह रास (Leo Rashi Bhavishya)
गुरु वक्री झाल्याने सिंह राशीच्या मंडळींचा लाभदायक काळ सुरु होऊ शकतो. हे तीन महिने सिंह राशीसाठी एखाद्या वरदानासारखे असतील. या काळात तुम्हाला चार बाजूंनी पैसे मिळू शकतात पण आर्थिक मिळकतीचा मोठा भाग हा तुमचे आई- वडील असू शकतात. पूर्वजांच्या एखाद्या महत्त्वपूर्ण गुंतवणुकीचा तगडा लाभ तुम्हाला मिळू शकतो. यात्रा- प्रवासाचे योग आहेत. नवीन लोकांशी जोडले जाल.
हे ही वाचा << २४ ऑक्टोबरपर्यंत बुधाचा अस्त कायम राहिल्याने ‘या’ राशींची दशा बदलणार! १६ दिवस कमावणार प्रचंड पैसे
मीन रास (Pisces Rashi Bhavishya)
मीन राशीचे स्वामीच गुरु देव असल्याने ते आपल्या राशीवर सुख व धनाचा वर्षाव करतील. तुमच्या आर्थिक स्त्रोतांची कक्षा रुंदावू शकते पण प्रत्येक गोष्ट इतक्या तुफान वेगाने होईल ही कुठेतरी स्वतःलाच संभ्रम वाटू शकतो. अशावेळी धैर्याने व समजूतदारीने निर्णय घ्या. वैवाहिक आयुष्यात सुखाची अनुभूती मिळेल. नोकरदार मंडळींना पगारवाढीचे योग आहेत. तुम्हाला अचानक व अनपेक्षित धनलाभ होत असताना बचत व गुंतवणुकीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)