Shani-Shukra Yuti Till 31st March 2024: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच म्हणजे ७ मार्च २०२४ ला शुक्राचे कुंभ राशीत गोचर पूर्ण झाले आहे. शुक्र हा धन, प्रेम, वैभवाचा कारक मानला जातो. तर या राशीत शनी महाराज मागील वर्षांपासून स्थित आहेत. शनी जानेवारी २०२३ मध्ये कुंभ राशीत गोचर करून पोहोचले होते आणि २०२५ पर्यंत शनी महाराज याच राशीत स्थिर असणार आहेत. ज्योतिषीय गणनेनुसार शनी व शुक्र या दोन्ही ग्रहांची युती अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या दोन्ही ग्रहांमध्ये मित्रत्वाचे नाते आहे. शनी व शुक्राची युती ३१ मार्च पर्यंत जागृत असणार आहे. त्यामुळे पुढील १६ दिवस ५ राशींच्या नशिबाचे तारे चमकणार आहेत. आर्थिक व कौटुंबिक बाजूने भरभक्कम जाणारा हा कालावधी नेमक्या कोणत्या राशींच्या नशिबात आहे हे पाहूया..

शनी महाराज व शुक्र देव आले एकत्र; १६ दिवस ‘या’ राशींवर होईल धन वर्षा

मेष रास (Aries Rashi Bhavishya)

मेष राशीच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकते. धार्मिक कार्यक्रमात रुची वाढेल. आरोग्यात सुद्धा सुधारणा होऊ शकते. कुटुंबातील जुने वाद सोडवता येतील व वैवाहिक आयुष्यात सुद्धा गोडवा कायम राहील. जुनाट आजरांवर मात करू शकाल.

13 December Daily Horoscope in Marathi
१३ डिसेंबर पंचांग: पंचांगानुसार शिवयोग १२ पैकी कोणत्या राशीची आर्थिक घडी सुधारणार? तुम्हाला लाभेल का भाग्याची साथ; वाचा शुक्रवारचे भविष्य
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Guru Asta 2025 Guru will set for 27 days in the new year
Guru Ast 2025: नवीन वर्षात २७ दिवसांनी अस्त होणार गुरू! ‘या’ राशींची होणार चांदी, झटपट वाढेल पगार
shani gochar 2025 zodiac sign today horoscope in marathi
Shani Gochar 2025 : २०२५ मध्ये शनीचे मीन राशीत गोचर, ‘या’ राशींच्या नशिबाचं टाळं उघडणार; रिकामी तिजोरी धनधान्याने भरण्याचे संकेत
Shani-Mercury kendra drishti
२७ डिसेंबरपासून ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य; शनी-बुधाची केंद्र दृष्टी देणार भरपूर पैसा
Mangal Rashi Parivartan 2024
४२ दिवसानंतर नुसता पैसा; मंगळाच्या राशी परिवर्तनाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्ती होणार भाग्यवान
Rahu Gochar 2025
Rahu Gochar 2025 : राहु बदलणार चाल, पडणार पैशांचा पाऊस! ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य
shukra guru make navpancham yog
नवपंचम राजयोग देणार पैसाच पैसा; ‘या’ तीन राशींवर शुक्र-गुरूची होणार कृपा

मिथुन रास (Gemini Rashi Bhavishya)

शनि आणि शुक्रदेवाची युती मिथुन राशींच्या लोकांसाठी लाभकारी ठरु शकते. या काळात रखडलेली कामे मार्गी लागू शकतात. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे त्यामुळे आर्थिक स्थिती पूर्वी पेक्षा चांगली होऊ शकते. आनंदाची बातमी मिळू शकते. करिअरची नवी दिशा तपासून पाहू शकाल. आयुष्यातील मरगळ दूर होऊ शकते.

तूळ रास (Libra Rashi Bhavishya)

या राशीच्या लोकांसाठी शनि आणि शुक्राचा संयोग जास्त फायदेशीर ठरणार आहे. या युतीचा संयोग तुमच्या दहाव्या घरात होत आहे. म्हणजेच, कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल. शनिच्या कृपेने नवीन आणि चांगली नोकरीची ऑफर देखील मिळू शकते. तसेच तुमच्या संपत्तीत वाढ होईल. गुंतवणुकीच्या नवीन संधी उपलब्ध होतील आणि व्यवसाय विस्तारासाठी ही योग्य वेळ असेल.

मकर रास (Capricorn Rashi Bhavishya)

मकर राशीसाठी शनि आणि शुक्राची युती अनुकूल ठरू शकते. या काळात तुम्हाला तुम्हाला विविध स्रोतांमधून उत्पन्न मिळेल आणि त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. तुम्हाला वडिलोपार्जित किंवा कौटुंबिक संपत्ती मिळण्याचीही शक्यता आहे. तुमच्या वाणीचा चांगला उपयोग करा, तुम्हाला त्याचे चांगले परिणाम मिळतील. तुम्ही कोणाचेही मन जिंकू शकता. मार्केटिंग, विक्री, एकूणच बोलण्याच्या संबंधित क्षेत्रातील मंडळींना लोकांना विशेष लाभ मिळेल.

हे ही वाचा<< ३० वर्षांनी गुढीपाडव्याला तीन राजयोग; शनी कृपेने ‘या’ तीन राशींचे नववर्ष अपार श्रीमंती व नव्या नोकरीने होईल सुरु

कुंभ रास (Aquarius Rashi Bhavishya)

कुंभ राशीतच शनी व शुक्राची युती निर्माण होत असल्याने याच राशीला सर्वाधिक लाभ प्राप्त होण्याची संधी आहे. शिक्षण व बँकिंग क्षेत्रातील कामात प्रचंड फायदा होऊ शकतो. तुम्हाला शेअर बाजारात गुंतवणूक करायची असल्यास हा काळ अत्यंत फायद्याचा ठरू शकतो. तुम्ही जर नवीन कामे सुरु केले तर तुम्हाला प्रचंड मोठा धनलाभ होऊ शकतो. तुम्हाला जुने अनुभव गाठीशी ठेवायचे आहेत पण त्यामुळे इतरांवर अविश्वास किंवा अतिविश्वास दाखवू नका.

(तीव: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Story img Loader