May 2023 Grah Gochar: मे महिन्याच्या सुरुवातीलाच शुक्र वृषभ राशीतून निघून बुध ग्रहाच्या मिथुन राशीत प्रवेश घेणार आहे. यामुळे मिथुन राशीत मंगळ व शुक्र युती तयार होत आहे. १० मे ला पुन्हा मंगळ कर्क राशीत प्रवेश करणार आहे. तर सूर्य सुद्धा या महिन्यात वृषभ राशीत स्थिर असणार आहेत, मंगळ कर्क राशीत येताच काही दिवसांनी उदित होऊन पुढील गोचरासाठी त्वरित मार्गी होणार आहे. या एकूण ग्रहस्थितीनुसार काही राशींना मे महिन्यात प्रचंड शुभ काळ अनुभवता येऊ शकणार आहे. ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार विशेषतः ४ राशींना प्रचंड धनलाभ व प्रगती अनुभवता येऊ शकते. या भाग्यवान राशी कोणत्या हे आपण जाणून घेऊया…
मे महिन्यात ‘या’ ५ राशी होणार प्रचंड श्रीमंत?
मिथुन रास (Gemini Zodiac)
मिथुन राशीला मे महिन्यात होणाऱ्या ग्रह गोचारांचा विशेष लाभ होण्याची चिन्हे आहेत. करिअरच्या दृष्टीने तुम्ही प्रगतीचे पाऊल पुढे टाकूशकता . या काळात आपल्याला मेहनतीचे फळ मिळू शकते त्यामुळे तुम्ही तितके कठोर परिश्रम घ्यायलाहवे . आपली आर्थिक स्थिती मजबूत झाल्याने समाजातमान – सन्मान सुद्धा वाढीस लागू शकतो पण त्यामुळे हुरळून जाऊ नका. वाडवडिलांचं संपत्तीच्या बाबत काहीतरी आनंदाची बातमी मिळू शकते. आपल्याला कोर्टाची पायरी चढावी लागू शकते अशी चिन्हे आहेत. अनेक ठिकाणी अडकलेले धन पुन्हा मिळवता येऊ शकते.
सिंह रास (Leo Zodiac)
सिंह राशीसाठी ग्रह गोचर हे अत्यंत शुभ ठरू शकते. तुम्हाला प्रेमाचा माणूस गवसण्याची शक्यता आहे. तुम्हाला याकाळात नोकरी बदलावी लागू शकते पण नवीन संधी तुमच्यासाठी अधिक फायद्याच्या असू शकतात. करिअरमध्ये प्रगतीसाठी मानसिक शक्तीवर खूप काम करावे लागू शकते. वाणीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत असलेल्यांना प्रगतीचा मोठा योग आहे.
वृश्चिक रास (Scorpio Zodiac)
वृश्चिक राशीसाठी मे महिना हा शुभ वार्ता घेऊन येऊ शकतो. बॉस व सहकर्मचाऱ्यांची साथ लाभल्याने तुम्हला मानसिक ताणतणाव जाणवणार नाही. या काळात तुम्हाला नोकरीच्या ऑफर येऊ शकतात पण तुम्हाला कौटुंबिक गोष्टींकडे सुद्धा लक्ष द्यावे लागेल त्यामुळे संधी सोडावी लागू शकते. तुमचे निर्णय अत्यंत विचारपूर्वक घ्या. खेळाडूंसाठी येणारा महिना लाभदायक ठरू शकतो. भागीदारी व विश्वासावर तुम्ही धनलाभ मिळवू शकता.
हे ही वाचा<< माता लक्ष्मी ६ दिवसात ‘या’ राशींना देईल अपार धनलाभ? मंगळ- शुक्र युती रातोरात बनवू शकते कोट्याधीश
मीन रास (Pisces Zodiac)
मीन राशीसाठी मे महिन्यातील ग्रह गोचर हे शुभ सिद्ध होऊ शकतात. तुम्हाला यशासाठी स्पर्धा करावी लागू शकते. वैवाहिक व कौटुंबिक आयुष्य अत्यंत सुंदर बदलांनी आनंदी होऊ शकते. तुम्हाला नवीन आर्थिक स्रोत लाभू शकतात. मिळकतीत वाढ होण्याची शक्यता आहे. आपल्या कुंडलीत अनपेक्षित व मोठ्या धनलाभाचा योग आहे. मनःशांतीमुळे तुम्ही खूप मोठे निर्णय सुद्धा सहज घेऊ शकता. शेअर बाजारात गुंतवणुकीवर भर दिल्यास फायदा होऊ शकतो.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)