Mangal Rashi Parivartan 2023: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक वेळेत आपल्या राशी व नक्षत्रातील गोचराच्या कक्षा बदलत असतो, कधी यातून शुभ योग निर्माण होतात तर काही वेळा प्रभावित राशींना कष्ट सोसावे लागतात. काल म्हणजेच मार्गशीर्ष गुरुवारच्या मुहूर्तावर मंगळ ग्रहाने धनु राशीत प्रवेश केला आहे. रात्री १२ वाजून ३६ मिनिटांनी ही गोचर प्रक्रिया पूर्ण झाली असून आता पुढील ३५ दिवस म्हणजेच साधारण फेब्रुवारीच्या सुरुवातीपर्यंत मंगळ ग्रह धनु राशीत कायम असणार आहे. वैदिक ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार ४ फेब्रुवारी २०२४ पर्यंत मंगळ याच स्थितीत धनु राशीत कायम असणार आहेत. यानंतर मंगळाचा मकर राशीत प्रवेश होईल. ज्योतिषशास्त्रात मंगळ हा साहस, पराक्रम व मांगल्याचा ग्रह सुद्धा मानला गेला आहे. मंगळाच्या राशी परिवर्तनाचा प्रभाव काही राशींना शुभ फळ देणार आहे. या कालावधीत नेमक्या कोणत्या नशीबवान राशींना लाभ होऊ शकतो हे पाहूया..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मंगळ गोचर झाले आता पुढील ३५ दिवस ‘या’ राशी करणार मौज!

सिंह रास (Leo Rashi Bhavishya)

ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ जेव्हा धनु राशीत गोचर करून स्थिर होतील तेव्हा सिंह राशीच्या जीवनात अनेक प्रकारचे सकारात्मक बदल दिसून येऊ शकतात. एवढंच नाही तर मंगळाच्या गोचर प्रभावाने तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला प्रचंड यश हाती लागू शकते. स्वतःचा व्यवसाय असल्यास दुप्पट नफ्याची चिन्हे दिसत आहेत. मुख्य म्हणजे मंगळासह काही प्रमाणात सूर्याचा प्रभाव सुद्धा तुमच्या राशीत असल्याने प्रत्येक बदल हा प्रकर्षाने जाणवणारे परिणाम घेऊन येऊ शकतो. पराक्रम करण्याची संधी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी अत्यंत उत्साही वातावरण अनुभवता येईल.

मकर रास (Capricorn Rashi Bhavishya)

मकर राशीचे स्वामित्व कर्मदेवता शनीकडे आहे. मंगळ व शनी यांच्यात मैत्रीचा भाव आहे. अशातच मंगळाचे गोचर मकर राशीसाठी शुभ सिद्ध होऊ शकते. या कालावधीत तुमचे जमीन- जुमल्याशी संबंधित काम पूर्णत्वास जाऊ शकते. वाद मिटण्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल. नव्या नोकरीच्या संधी चालून येऊ शकतात. संवादात अत्यंत स्पष्टता बाळगा अन्यथा यातून नुकसान होण्याची चिन्हे आहेत. प्रेमाच्या नात्यातून प्रचंड बळ मिळेल. जोडीदाराचा आदर करा.

हे ही वाचा<< गुरु-मंगळाची बदललेली चाल ‘या’ राशींना बनवणार धनपती; हाती लागेल सोन्यासम खजिन्याची चावी, तुम्ही आहात का नशीबवान?

कुंभ रास (Aquarius Rashi Bhavishya)

कुंभ रास सुद्धा शनीच्या स्वामित्वाची रास म्हणून ओळखली जाते. आपल्या राशीत अगोदरच शनिदेव स्थिर आहेत व पुढील वर्षभर ही स्थिती कायम राहणार आहे. शनीचा प्रभाव आपल्यासाठी शुभ ठरतो त्यात आता मंगळाच्या प्रभावाची जोड मिळाल्याने आपल्याला यशाच्या शिखरावर पोहोचता येणार आहे. फेब्रुवारीपर्यंतच्या कालावधीत आपल्याला धनवर्षाव अनुभवता येऊ शकतो. तुमच्या बोलण्याचा अनेकांना राग येऊ शकतो पण सत्यावर ठाम रहा. विद्यार्थी वर्गाला या कालावधीत लक्ष केंद्रित करण्यास अनुकूल वातावरण तयार होईल.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Till 4th february 2024 mangal gochar in dhanu will make these shani surya loved rashi extreme rich shower with money astrology svs
Show comments