ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाचे महत्त्व सांगण्यात आले आहे. त्यानुसार गुरु ग्रह ज्ञान, शिक्षा, संतती, धार्मिक कार्य, पवित्र स्थान, धन, दान, पुण्य आणि वृद्धीसाठी जबाबदार असणारा ग्रह मानले जाते. गुरु हा ग्रह धनु आणि मीन राशीचा स्वामी आहे. तसेच या ग्रहाची उच्च राशी कर्क तर मकर ही दुर्बल राशी आहे. ज्योतिषशास्त्रानुसार २९ जुलै २०२२ रोजी गुरु ग्रह मीन राशीमध्ये विक्री झाला होता. तो २४ नोव्हेंबरला सकाळी ४ वाजून ३५ मिनिटांनी या राशीतून संक्रमण करेल. याचा सर्व राशींवर प्रभाव पडणार असला तरीही काही राशींच्या लोकांना २४ नोव्हेंबरपर्यंत अनेक समस्यांचा सामना करावा लागणार आहे. या राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.
- मिथुन :
या राशींच्या लोकांना या काळात कौटुंबिक कलहाचा सामना करावा लागेल. तसेच जर तुम्ही कोणताही नवीन व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत असाल, तर त्यासाठी हा काळ अनुकूल नाही.
- कन्या :
या काळात कन्या राशीच्या लोकांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. या काळात नात्यामध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो. तसेच जोडीदाराबरोबर काही जुन्या प्रकरणावरून वाद होण्याची दाट शक्यता आहे.
- मेष :
गुरु हा ग्रह या राशीच्या नवव्या आणि बाराव्या ग्रहाचा स्वामी असल्याने गुरूच्या प्रभावामुळे या राशीच्या लोकांच्या कार्यस्थळी काही समस्या उद्भवू शकतात. व्यवसायात अडचणी येऊ शकतात. गुंतवणुकीसाठी ही वेळ योग्य नाही.
- वृषभ :
या काळात या राशीच्या लोकांच्या खर्चात वाढ झाल्याने त्यांना आर्थिक चणचण भासू शकते. तसेच, आरोग्याच्या समस्याही उदभवू शकतात. या काळात कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्यावा. यापूर्वी आपल्या वरिष्ठांचा सल्ला अवश्य घ्यावा.
- तूळ :
तूळ राशीच्या लोकांचा खर्च वाढून व्यवसायात नुकसान होऊ शकते. त्याचबरोबर जोडीदाराबरोबर वाद होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी काही अडचणी येऊ शकतात किंवा सहकार्याशी वाद वगैरे होऊ शकतात. त्यामुळे असे प्रसंग टाळण्याचा प्रयत्न करा.
(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)