Trigrahi Yog in Pisces Zodiac: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह एका विशिष्ट कालावधीत गोचर करून त्रिग्रही योग आणि राजयोग तयार करतात, ज्याचा परिणाम सर्व राशीच्या लोकांवर होतो. ज्योतिषशास्त्रानुसार १४ एप्रिल रोजी ग्रहांचा राजकुमार बुधदेवाने मीन राशीत प्रवेश केला आहे. या राशीत शनी आणि सूर्य आधीच उपस्थित आहेत, म्हणून येथे शनी, बुध आणि शुक्र यांची युती होऊन मीन राशीमध्ये त्रिग्रही योग निर्माण झाला आहे; त्यामुळे काही राशींना मोठा फायदा होण्याची शक्यता असते. चला तर पाहूया कोणत्या आहेत, या भाग्यशाली राशी…
‘या’ राशींच्या व्यक्ती होणार मालामाल?
वृषभ
त्रिग्रही योग बनल्याने या राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये बरेच फायदे मिळण्याची शक्यता आहे. परदेशात नोकरीची संधी मिळू शकणार आहे. व्यवसायात तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. नवीन व्यवसाय सुरू करू शकता. वडिलोपार्जित मालमत्तेच्या माध्यमातून तुम्ही भरपूर पैसे कमवू शकता. आर्थिक स्थितीही मजबूत होण्याची शक्यता आहे.
मिथुन
त्रिग्रही योग बनल्याने मिथुन राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते. या कालावधीत तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये बरेच सकारात्मक परिणाम मिळू शकतात. नोकरीत नवीन संधी मिळू शकतात. परदेशात व्यवसाय करणाऱ्यांनाही मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थितीही चांगली राहू शकते. काही चांगली बातमी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी यशाचे संकेत आहेत.
सिंह
त्रिग्रही योग सिंह राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. या लोकांना त्यांच्या मेहनतीचे अनुकूल फळ मिळू शकते. पैशाशी संबंधित योजना यशस्वी होऊ शकतात. व्यावसायिक लोकांना मोठा फायदा होऊ शकतो. व्यवसाय वाढविण्याच्या नवीन संधी मिळू शकतात. अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. समाजात मान-सन्मान मिळू शकतो.
तूळ
त्रिग्रही योग बनल्याने तूळ राशीच्या लोकांना मोठा धनलाभ होऊ शकतो. तुम्ही कोणतीही गुंतवणूक कराल तर तुम्हाला भविष्यात फायदा होऊ शकतो. वडिलधाऱ्यांचा पूर्ण आशीर्वाद मिळणार आहे. व्यावसायिक जीवनात अपेक्षित यश मिळू शकणार आहे. तुमचे धैर्य, सामर्थ्य आणि आत्मविश्वासदेखील वाढू शकतो.
धनू
त्रिग्रही योग बनल्याने धनू राशीच्या लोकांना या काळात नवीन संधी मिळू शकतात. तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकतं. त्रिग्रही योगातून आर्थिक लाभ होण्याची चांगली शक्यता आहे. तुम्ही केलेल्या जवळपास सर्व योजना यशस्वी होऊ शकतात. नवीन नोकरीच्या ऑफरदेखील येऊ शकतात.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)