Horoscope Today in Marathi, 28 April 2025 : २८ एप्रिल २०२५ रोजी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी आहे. प्रतिपदा तिथी रात्री ९ वाजून ११ मिनिटांपर्यंत राहील. भरणी नक्षत्र रात्री ९ वाजून ३८ मिनिटांपर्यंत जागृत असेल. रात्री ८ वाजून २ मिनिटांपर्यंत आयुष्मान योग जुळून येईल. राहू काळ ७ वाजता सुरु होईल ते ९ वाजेपर्यंत असणार आहे. तर तुमच्या आठवड्याची सुरुवात कशी होणार हे प्रत्येक राशीच्या राशिभविष्यातून जाणून घेऊया…

२८ एप्रिल पंचांग व राशिभविष्य ( Rashi Bhavishya In Marathi, 28 April 2025)

मेष आजचे राशिभविष्य (Aries Rashi Bhavishya In Marathi)

मानसिक ताणतणाव जाणवेल. औद्योगिक प्रगतीकडे लक्ष द्यावे. वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. नवीन संधी उपलब्ध होतील.

वृषभ आजचे राशिभविष्य (Taurus Rashi Bhavishya In Marathi)

उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. झोपेचे तक्रार जाणवेल. कामातील बदल लक्षात घ्यावेत. काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न कराल. वडीलधार्‍यांशी मतभेद संभवतात.

मिथुन आजचे राशिभविष्य (Gemini Rashi Bhavishya In Marathi)

प्रवासात काळजी घ्यावी. काही गोष्टी लपविण्याकडे कल राहील. मनातील चुकीच्या कल्पना काढून टाकाव्यात. अधिकारी व्यक्तींची ओळख होईल. उपासनेचे बळ वाढवावे.

कर्क आजचे राशिभविष्य (Cancer Rashi Bhavishya In Marathi)

नवीन स्नेह संबंध जुळून येतील. प्रेमसंबंधाला पुष्टी मिळेल. करमणुकीत वेळ घालवाल. स्व‍च्छंदी वृत्तीने वागाल. मनातील इच्छा पूर्ण करून घ्याल.

सिंह आजचे राशिभविष्य (Leo Rashi Bhavishya In Marathi)

दिवसभर घरगुती कामात गुंग राहाल. हाताखालील नोकरांचे सौख्य लाभेल. कामात मन रमवले जाईल. जोडीदाराविषयीचे गैरसमज काढून टाकावेत. वरिष्ठांकडून कौतुक केले जाईल.

कन्या आजचे राशिभविष्य (Virgo Rashi Bhavishya In Marathi)

उष्णतेचे विकार संभवतात. मनातील निराशाजनक विचार काढून टाका. जवळच्या ठिकाणाला भेट देता येईल. आपल्या वागण्याने इतरांची मने जिंकून घेण्याचा प्रयत्न करावा. भावंडांची वेळीच मदत मिळेल.

तूळ आजचे राशिभविष्य (Libra Rashi Bhavishya In Marathi)

कौटुंबिक गोष्टींना प्राधान्य द्याल. मुलांच्या धडपडीकडे लक्ष द्यावे. व्यावहारिक दृष्टीकोन बाळगाल. कमी कष्टात कामे पार पडतील. आवडीचे पदार्थ खाल.

वृश्चिक आजचे राशिभविष्य (Scorpio Rashi Bhavishya In Marathi)

आवडत्या गोष्टी करण्याकडे कल राहील. दिवस स्वत:च्या मर्जीप्रमाणे घालवाल. जोडीदाराच्या मताचा विचार करावा. काही गोष्टी मनाविरुद्ध घडू शकतात. घराबाहेर वावरतांना सतर्क राहावे.

धनू आजचे राशिभविष्य (Sagittarius Rashi Bhavishya In Marathi)

तुमच्यातील महत्वाकांक्षा वाढीस लागेल. किरकोळ दुखापतींकडे दुर्लक्ष करू नका. मानसिक स्थैर्य जपावे. हाताखालील लोकांकडून कामे वेळेत पार पडतील. कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवावा

आजचे मकर राशिभविष्य (Capricorn Rashi Bhavishya In Marathi)

स्वभावात काहीसा उधळेपणा येईल. भागिदारीतून चांगला लाभ मिळेल. तुमच्या मनाची तरलता दिसून येईल. जुगाराची आवड पूर्ण कराल. दिवस स्व‍च्छंदीपणे घालवाल.

आजचे कुंभ राशिभविष्य (Aquarius Rashi Bhavishya In Marathi)

रागावर नियंत्रण ठेवावे. काही गोष्टींबाबत दृढ निश्चय करावा लागेल. पित्त विकाराचा त्रास संभवतो. एककल्ली विचार करू नका. घरगुती वातावरणात रमून जाल.

आजचे मीन राशिभविष्य (Pisces Rashi Bhavishya In Marathi)

सामुदायिक गोष्टींचे भान राखावे. गैर समजुतीतून त्रास संभवतो. डोळ्यांचे विकार बळावू शकतात. कचेरीच्या कामात वेळ जाईल. धार्मिक स्थळांना भेट द्याल.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर