Dainik Rashi Bhavishya Updates : ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रह आणि त्यांच्या स्थितीचा अभ्यास केला जातो. हे ग्रह वेळोवेळी नक्षत्र आणि राशी बदलतात ज्याचा परिणाम व्यक्तीच्या जीवनावर आणि भविष्यावर होतो. ग्रह आणि नक्षत्रांच्या आधारे भविष्याविषयी माहिती दिली जाते. ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशी आहेत. या बारा राशींवर येत्या काळात ग्रहांचा आणि नक्षत्राचा काय प्रभाव होईल याचा अंदाज व्यक्त केला जातो. तसेच ज्योतिष्यशास्त्र आधारे १२ राशींचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्वाविषयी अंदाज व्यक्त केला जातो.

Live Updates

Today's Astrology in Marathi : आजचे राशिभविष्य लाईव्ह २५ एप्रिल २०२५

19:07 (IST) 25 Apr 2025

मीन आजचे राशिभविष्य (Pisces Rashi Bhavishya in Marathi)

आपल्या मताबद्दल आग्रही राहाल. हसत खेळत कामे साधून घ्याल. जोडीदाराचे प्रेमळ सौख्य वाढेल. व्यावसायिक लाभणे खुश व्हाल. चैनीच्या वस्तु खरेदी कराल.

19:07 (IST) 25 Apr 2025

कुंभ आजचे राशिभविष्य (Aquarius Rashi Bhavishya in Marathi)

आततायीपणे निर्णय घेऊ नका. तुमच्या शब्दाला वजन प्राप्त होईल. तुमचे अंदाज अचूक ठरतील. मनातील नैराश्य बाजूस सारावे. प्रवासाचा योग येईल.

19:06 (IST) 25 Apr 2025

Monthly Horoscope May 2025: या महिन्यात ७ राशींना मिळेल भाग्याची साथ, पदोन्नतीसह वाढणार पगार, मासिक राशिभविष्य जाणून घ्या

Monthly Horoscope May 2025 In Marathi : मेष, वृषभ, कर्क, सिंह, मिथुन, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशींचे मासिक राशीभविष्य जाणून घेऊया… ...सविस्तर वाचा
16:39 (IST) 25 Apr 2025

मकर आजचे राशिभविष्य (Capricorn Rashi Bhavishya in Marathi)

कौटुंबिक खर्च वाढू शकतो. वाहन चालवताना सतर्कता बाळगावी. मन:शांतीसाठी ध्यानधारणा करावी. जवळचे नातेवाईक भेटतील. प्रेमप्रकरणातील घनिष्टता वाढेल.

16:14 (IST) 25 Apr 2025

धनू आजचे राशिभविष्य (Sagittarius Rashi Bhavishya in Marathi)

सामाजिक कार्यात भाग घ्याल. योग्य तर्कनिष्ठ बुद्धी वापराल. स्वत:चा मान राखून वागणे ठेवाल. उपासनेला बळ मिळेल. मुलांशी क्षुल्लक मतभेद संभवतात.

15:21 (IST) 25 Apr 2025

वृश्चिक आजचे राशिभविष्य (Scorpio Rashi Bhavishya in Marathi)

प्रवासात सावधानता बाळगावी. नातेवाईकांचे प्रश्न सामोरे येतील. अभ्यासू दृष्टिकोन ठेवाल. आशावादी दृष्टिकोन वाढीस लागेल. सर्वांना प्रेमळपणे आपलेसे कराल.

14:53 (IST) 25 Apr 2025

तूळ आजचे राशिभविष्य (Libra Rashi Bhavishya in Marathi)

जुन्या कामातून लाभ संभवतो. कामे वेळेत पार पडतील. मानसिक द्विधावस्था टाळावी. मुलांच्या वागण्याकडे लक्ष द्यावे. जोडीदाराशी मतभेद संभवतात.

12:55 (IST) 25 Apr 2025

Monthly Horoscope May 2025: या महिन्यात ७ राशींना मिळेल भाग्याची साथ, पदोन्नतीसह वाढणार पगार, मासिक राशिभविष्य जाणून घ्या

Monthly Horoscope May 2025 In Marathi : मेष, वृषभ, कर्क, सिंह, मिथुन, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशींचे मासिक राशीभविष्य जाणून घेऊया… ...सविस्तर वाचा
12:33 (IST) 25 Apr 2025

आजपासून 'या' राशींच्या आयुष्यात सुखाचे वळण! शनिदेवाच्या राशीत चंद्राचा प्रवेश; लक्ष्मीच्या पावलांनी येणार पैसा? कोणाला होणार लाभ...!

Moon Transit 2025: चंद्रदेवाने मीन प्रवेश केल्यामुळे काही राशींचे नशीब फळफळणार आहे. पाहा तुमची रास आहे यात... ...अधिक वाचा
12:30 (IST) 25 Apr 2025

चतुर्ग्रही योग 'या' तीन राशींना देणार गडगंज श्रीमंती? मीन राशीतील बुध, शुक्र, शनी आणि राहूची उपस्थिती आयुष्य बदलणार

Chaturgrahi Yog Effect: या ग्रहांच्या एकाच राशीत निर्माण झालेल्या संयोगामुळे या योगाला चतुर्ग्रही योग म्हटले जात आहे. हा योग काही राशींच्या व्यक्तींसाठी नक्कीच फायदेशीर ठरेल. ...सविस्तर बातमी
12:08 (IST) 25 Apr 2025

कन्या आजचे राशिभविष्य (Virgo Rashi Bhavishya in Marathi)

परोपकाराची जाणीव ठेवाल. वैचारिक दृष्टिकोन सुधाराल. अंगीभूत कलेला पोषक वातावरण मिळेल. दिवस मजेत जाईल. प्रकृतीची हेळसांड करू नका.

11:53 (IST) 25 Apr 2025

सिंह आजचे राशिभविष्य (Leo Rashi Bhavishya in Marathi)

सर्वांच्या कौतुकास पात्र व्हाल. कामाच्या ठिकाणी चांगले वातावरण राहील. घरगुती वापराच्या वस्तूंची खरेदी केली जाईल. आवडते खाद्यपदार्थ खायला मिळतील. अनपेक्षित लाभणे खुश व्हाल.

11:33 (IST) 25 Apr 2025

कर्क आजचे राशिभविष्य (Cancer Rashi Bhavishya in Marathi)

मित्रांच्या ओळखीचा फायदा होईल. चांगले वाहन सौख्य लाभेल. निसर्ग सौंदर्याची ओढ वाढेल. सर्वांशी आनंदी वृत्तीने वागाल. वातविकाराचा त्रास संभवतो.

10:59 (IST) 25 Apr 2025

Shani Nakshatra Gochar : अक्षय्य तृतीयापूर्वी शनि बदलणार चाल, 'या' चार राशींच्या अडचणीत होऊ शकते वाढ

Shani Nakshatra Gochar 2025 News In Marathi : अक्षय्य तृतीयेपूर्वी २८ एप्रिल रोजी शनि नक्षत्र परिवर्तन करणार आहे. जसे शनि नक्षत्र परिवर्तन करणार, तसे चार राशींच्या अडचणीमध्ये वाढ होऊ शकते. कारण उत्तराभाद्रपद नक्षत्र हा शनिचा नक्षत्र आहे. या नक्षत्रात प्रवेश करताच शनिदेवाला बळ मिळेल ...सविस्तर बातमी
10:34 (IST) 25 Apr 2025

गजकेसरी राजयोगाने पालटणार 'या' राशींचे भाग्य, २९ एप्रिलपासून नवीन नोकरीसह मिळणार भरपूर आर्थिक लाभ

Gajkesari Rajyog 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, २९ एप्रिल रोजी चंद्र वृषभ राशीत गुरुशी युती करेल. यावेळी चंद्र आणि गुरुच्या युतीने गरकेसरी राजयोग निर्माण होईल, जो १२ पैकी ३ राशींच्या लोकांसाठी फलदायी ठरु शकतो. ...सविस्तर वाचा
10:33 (IST) 25 Apr 2025

मिथुन आजचे राशिभविष्य (Gemini Rashi Bhavishya in Marathi)

तरुण वर्गाशी मैत्री कराल. अधिकारी वर्गाची मदत मिळेल. मनातील सुप्त इच्छा पूर्ण होईल. जोडीदाराचा प्रेमळ सहवास लाभेल. क्षणिक सौख्यात रमून जाल.

10:09 (IST) 25 Apr 2025

वृषभ आजचे राशिभविष्य (Taurus Rashi Bhavishya in Marathi)

वृषभ राशीच्या लोकांनी जामीनकीचे व्यवहार तूर्तास टाळावेत. प्रवासाचे बेत आखाल. गुरूजनांचा आशीर्वाद लाभेल. महत्त्वाचे कागदपत्रे तपासून पहावीत. चारचौघांत मिळून मिसळून वागाल.

09:42 (IST) 25 Apr 2025

मेष आजचे राशिभविष्य (Aries Rashi Bhavishya in Marathi)

बौद्धिक चलाखी दाखवाल. तत्परतेने कामे कराल. आपल्या भावना उत्तम प्रकारे मांडाल. हसत खेळत कामे कराल. चिकित्सक नजरेने गोष्टी जाणून घ्या.

सविस्तर वाचा

09:16 (IST) 25 Apr 2025

ऑक्टोबरपर्यंत शनी वाढवणार 'या' तीन राशींचा बँक बॅलन्स; शनीचे नक्षत्र परिवर्तन पदोपदी यश अन् उत्पन्नात झपाट्याने वाढ देणार

Shani Transit 2025: पंचांगानुसार, २८ एप्रिल रोजी शनी त्याचे स्वामीत्व असलेल्या उत्तराभाद्रपद नक्षत्रामध्ये सकाळी ७ वाजून ५२ मिनिटांनी प्रवेश करणार असून या नक्षत्रामध्ये तो ३ ऑक्टोबरपर्यंत विराजमान असेल. ...वाचा सविस्तर
07:47 (IST) 25 Apr 2025

१०० वर्षांनी अक्षय्य तृतीयेला ६ दुर्मिळ राजयोग! ‘या’ राशींच्या लोकांना मिळेल चिक्कार पैसा? लक्ष्मीच्या कृपेने सुख-समृद्धीत होणार वाढ!

अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. धनाची देवी लक्ष्मीला समर्पित हा दिवस आहे. या दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाते. योगायोगाने शंभर वर्षांनी अक्षय्य तृतीयेलाच तब्बल ६ शुभ योग जुळून आले आहेत. या दिवशी गजकेसरी राजयोग, मालव्य राजयोग, रवियोग, चतुर्ग्रही योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि लक्ष्मी नारायण राजयोग यांसह अनेक दुर्मिळ आणि अत्यंत शुभ राजयोग तयार होत आहेत.

सविस्तर वाचा

07:16 (IST) 25 Apr 2025

Nautapa 2025 : यंदा नवतपा कधी? चंद्राच्या घरात सूर्य करणार प्रवेश, ९ दिवस असणार तीव्र उष्णतेची लाट

Nautapa 2025 Date : हिंदू धर्मात नवतपाला विशेष महत्त्व आहे. हे उन्हाळ्यातील नऊ दिवस असतात जेव्हा पृथ्वी सूर्याच्या अगदी जवळ असते. या कारणाने या नऊ दिवसात वर्षातून सर्वात जास्त उन्हाचा पारा वाढतो. असं म्हणतात जर नवतपामध्ये चांगली ऊन तापली तर पाऊस सुद्धा चांगला पडतो, ज्यामुळे लोकाना दिलासा मिळतो.

सविस्तर वाचा

07:15 (IST) 25 Apr 2025

Aajche Rashi Bhavishya : शुक्र प्रदोष व्रताच्या दिवशी ‘या’ राशींना इच्छापूर्तीसह मिळेल अपार धनलाभ; तुमच्या आयुष्यात काय नवं घडणार?

Today Horoscope in Marathi, 25 April 2025 : २५ एप्रिल २०२५ रोजी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी आहे. द्वादशी तिथी सकाळी ११ वाजून ४५ मिनिटांपर्यंत राहील, त्यानंतर त्रयोदशी तिथी सुरु होईल. पूर्वा भाद्रपद नक्षत्र सकाळी ८ वाजून ५४ मिनिटांपर्यंत जागृत असेल, त्यानंतर उत्तरा भाद्रपद नक्षत्र सुरु होईल. दुपारी १२ वाजून २१ मिनिटांपर्यंत इंद्र योग जुळून येईल. राहू काळ १० वाजून ३० मिनिटांनी सुरु होईल ते १२ वाजेपर्यंत असणार आहे. विशेष म्हणजे शुक्रवारी प्रदोष व्रत सुद्धा असणार आहे.

सविस्तर वाचा

<strong>आजचे राशिभविष्य लाईव्ह २५ एप्रिल २०२५</strong>