Chandra Grahan 2023 : यंदाच्या वर्षातील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण खूप खास आहे, कारण ते भारतातही दिसणार आहे. तर आजच्या चंद्रग्रहणाच्या (२८ ऑक्टोबर) दिवशी अनेक आश्चर्यकारक आणि महत्वाचे योग घडत आहेत. अनेक दशकांनंतर शरद पौर्णिमेला चंद्रग्रहण लागणार आहे, याशिवाय मेष राशीत चंद्र आणि गुरु मिळून गजकेसरी राजयोग तयार करणार आहेत. या योगामुळे या चंद्रग्रहणाचा सर्व १२ राशींवर मोठा प्रभाव पडणार आहे. मात्र यापैकी काही राशींसाठी हे चंद्रग्रहण जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणारे ठरु शकते. शिवाय या राशींच्या लोकांची करिअरमध्ये खूप प्रगती होऊन त्यांना खूप पैसा मिळण्याची शक्यता आहे. तर या भाग्यवान राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊ.

‘या’ राशींवर चंद्रग्रहणाचे शुभ परिणाम दिसून येणार

budh uday 2024
आता नुसता पैसा; डिसेंबरपासून बुधाच्या प्रभावाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींच्या धनसंपत्तीत होणार वाढ
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Mangal Gochar 2024
पुढील १२९ दिवस मंगळ करणार मालामाल; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार बक्कळ पैसा अन् प्रत्येक कामात यश
guru and shukra yuti | Gaj Lakshmi Rajyog
Gaj Lakshmi Rajyog : मिथुन राशीमध्ये १२ वर्षानंतर निर्माण होणार गजलक्ष्मी राजयोग, या तीन राशींचे नशीब चमकणार, होणार आकस्मिक धनलाभ
shani surya gochar 2024 saturn Vakri and sun transit in vrishchik
सूर्य आणि शनि बदलणार आपली चाल, ‘या’ राशीच्या लोकांचे नशीब पलटणार, विलासी जीवनासह मिळेल अपार पैसा
Malavya Rajyog
शुक्र निर्माण करणार मालव्य राजयोग! २०२५ मध्ये ‘या’ राशींचे नशीब पलटणार, करिअरमध्ये यशासह मिळणार अपार धन
shukra gochar 2024
डिसेंबर महिन्यात शुक्र दोनदा करणार गोचर, ‘या’ तीन राशींचे पालटणार नशीब, मिळणार अपार पैसा अन् धन
Dev deepawali 2024
देव दिवाळीपासून शनी-गुरूचा जबरदस्त प्रभाव; ‘या’ तीन राशींच्या दारी नांदणार लक्ष्मी

वृषभ रास –

आजचे चंद्रग्रहण वृषभ राशीच्या लोकांना खूप काही देणारे ठरु शकते. या काळात तुमची प्रलंबित कामे लवकर पूर्ण होऊ शकतात. तसेच तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळू शकते. तुम्ही आत्मविश्वासी आणि उत्साही राहू शकता. तुम्हाला मान-सन्मान मिळू शकतो. तुम्हाला तुमचे अनेक दिवसांपासून अडकलेले पैसे मिळू शकतात. शिवाय उत्पन्नाचे स्त्रोतदेखील वाढू शकतात.

मिथुन रास –

मिथुन राशीच्या लोकांसाठी हे चंद्रग्रहण शुभ परिणाम देणारे ठरु शकते. तुमच्या जीवनातील आनंद वाढू शकतो. नोकरदारांना प्रमोशन मिळू शकते. समाजात तुमचा आदर वाढू शकतो. व्यवसाय करणाऱ्यांनाची या काळात खूप प्रगती होऊ शकते. तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे.

तूळ रास –

वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण तूळ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरु शकते. तुमच्यावर नशीबाची कृपा राहू शकते, ज्यामुळे तुमची प्रलंबित कामे लवकरच पूर्ण होऊ शकतात. तुम्हाला तुमच्या कष्टाचे पूर्ण फळ मिळू शकते. व्यापारी वर्गातील लोकांना मोठा धनलाभ होऊ शकतो. कौटुंबिक जीवन आनंदी राहू शकते.

हेही वाचा- २८ की २९ ऑक्टोबर, २०२३ चं शेवटचं खंडग्रास चंद्रग्रहण नक्की कधी? सुतक काळ, तिथी जाणून घ्या

कुंभ रास –

हे चंद्रग्रहण तुमच्या आर्थिक अडचणी दूर करुन तुम्हाला धनलाभ करुन देणारे ठरु शकते. या काळात तुम्हाला चांगली गुंतवणूक करण्याची संधी मिळू शकते, जी भविष्यात मोठा नफा मिळवून देण्याची शक्यता आहे. या काळात तुमचा कल धार्मिक कार्यक्रमांकडे असू शकतो. वैवाहिक जीवन आनंदी राहू शकते. कामामध्ये वडिलांचे सहकार्य मिळण्याची शक्यता आहे.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)