May Born People : ज्योतिषशास्त्रानुसार वर्षाच्या बारा महिन्यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. व्यक्तीचा जन्म कोणत्या महिन्यात झाला यावरून त्याचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्व ओळखता येऊ शकते. आज आपण मे महिन्यात जन्मलेले लोक स्वभावाने कसे असतात, याविषयी जाणून घेणार आहोत. हे लोक खूप लोकप्रिय आणि आकर्षक असतात. अनेकदा हे लोक निष्काळजीपणा सुद्धा करतात पण एखादी गोष्ट जर करायची त्यांनी ठरवली तर ते पूर्ण करतात. चला या लोकांविषयी सविस्तर जाणून घेऊ या.
या असतात राशी – जर तुमचा जन्म १ मे ते २० मे दरम्यान झाला असेल तर तुमच्या जन्मतिथीनुसार तुमची रास ही वृषभ असते आणि जर तुमचा जन्म २१ मे ते ३१ मे दरम्यान झाला असेल तर तुमची रास ही मिथुन असते.
- भाग्यवान आकडा – २, ३, ७, ८
- भाग्यवान रंग – पांढरा, मरीन ब्लू, मेहेंदी
- भाग्यवान दिवस – रविवार, सोमवार, शनिवार
- भाग्यवान स्टोन – ब्लू टोपाज
या महिन्यात जन्मलेल्या लोकांची कल्पनाशक्ती खूप जास्त दिसून येते. या लोकांना सतत वाटते की सर्वांनी त्यांच्याकडे पाहावे. हे नेहमी त्यांच्या मनाचे ऐकतात. साहित्य आणि कला क्षेत्रात या लोकांना विशेष आवड असते. हे लोक अतिशय सुंदर आणि बुद्धीने हूशार असतात. या महिन्यात जन्मलेले लोक खूप पारंपारिक असतात. या महिन्यात जन्मलेले लोक खूप वर्चस्ववादी असतात.
हेही वाचा : Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला शुभ योग; ‘या’ वेळेत करा नव्या वस्तूंची खरेदी; वाचा शुभ मुहूर्त, तिथी
या महिन्यात जन्माला येणारे लोक पायलट, डॉक्टर, पत्रकार, लेखक, इंजिनीअर किंवा यशस्वी अधिकारी होतात. या लोकांचा ड्रेसिंग सेन्स खूप चांगला असतो. याच कारणाने मे महिन्यात जन्मलेल्या मुली फॅशन डिजाइनर होऊ शकतात. याशिवाय या महिन्यात जन्मलेल्या मुलींच्या स्वभावामध्ये अहंकार दिसून येतो. लहान लहान गोष्टींवर त्या नाराज होतात. या लोकांमध्ये प्रेम भरभरून दिसून येते पण कोणी विश्वासघात केला तर परत त्याच व्यक्तीवर विश्वास ठेवणे कठीण जाते. संगीत आणि कला क्षेत्रात या लोकांना आवड असते. हे लोक नातेसंबंधांविषयी खूप जास्त सीरीअर दिसून येतात. एखाद्या व्यक्तीवर खरं प्रेम करत असेल तर त्यांना आयुष्यभर साथ देतात.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे