Mangal Gochar 2022: मंगळ ग्रह मेष सोडून वृषभ राशीत प्रवेश करत आहे. ज्योतिषशास्त्राच्या गणनेनुसार, मंगळ १० ऑगस्ट २०२२ रोजी रात्री ९.३२ वाजता वृषभ राशीत प्रवेश करेल. वैदिक ज्योतिषात, मंगळ ग्रह हा ऊर्जा, जमीन, सामर्थ्य, धैर्य, पराक्रम, शौर्य यांचा कारक आहे. असे मानले जाते की ज्या व्यक्तीच्या कुंडलीत मंगळाची स्थिती चांगली असते, तो धैर्यवान आणि निर्भय असतो आणि प्रत्येक क्षेत्रात यश मिळवतो. मंगळाचे हे संक्रमण काही राशींसाठी चांगले आहे आणि अनेक राशीच्या लोकांच्या आयुष्यात घबराट निर्माण करू शकते. १६ ऑक्टोबरपर्यंत जाणून घ्या कोणत्या राशीच्या लोकांनी सावध राहण्याची गरज आहे.
मेष
मेष राशीच्या लोकांसाठी मंगळाच्या राशीतील बदल अशुभ असू शकतो. तुमची इच्छा पूर्ण होणार नाही. कठोर परिश्रम करूनही तुम्हाला अपेक्षित परिणाम मिळणार नाही. प्रकृतीत थोडासा बदल होईल. वाढत्या रागामुळे चालू असलेली कामेही बिघडतील त्यामुळे रागावर संयम ठेवणे हिताचे ठरेल. वैवाहिक जीवनात काही उलथापालथ होईल. मात्र, जोडीदाराची साथ मिळाली तर अनेक प्रश्न मार्गी लागतील.
( हे ही वाचा: Shukra Gochar 2022: ३१ ऑगस्टपर्यंत ‘या’ चार राशीच्या लोकांच्या आयुष्यात होईल बदल; लवकरच मिळेल आनंदाची बातमी)
मिथुन
मिथुन राशीच्या लोकांसाठी मंगळाचे संक्रमण देखील शुभ सिद्ध होणार नाही. काही ना काही कारणाने खर्च वाढतील. त्यामुळे थोडा हुशारीने खर्च करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे पैशांचा तोटा होणार नाही. या काळात आरोग्याची पूर्ण काळजी घ्या. वैवाहिक जीवनात काही वाद होऊ शकतात. त्यामुळे रागावर संयम ठेवा आणि महत्वाचे निर्णय घ्या.
तूळ
मंगळाचे राशी बदलणे तूळ राशीच्या लोकांसाठी अशुभ सिद्ध होऊ शकते. तुम्हाला जीवनात अनेक मोठ्या आव्हानांना सामोरे जावे लागेल. तुम्हाला या काळात शारीरिक तसेच मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. तुमच्या बोलण्यावर पूर्ण नियंत्रण ठेवा, नाहीतर काम आणि संबंध तुटतील. वैवाहिक जीवनात देखील समस्या येऊ शकतात. मात्र, जोडीदाराची साथ मिळाल्यास अनेक समस्यांवर तोडगा काढता येईल.
( हे ही वाचा: ‘या’ ३ राशींना शनिदेवाच्या उलट चालीचा फायदा होईल, जाणून घ्या तुमचाही यात समावेश आहे की नाही)
मीन
मंगळाच्या भ्रमणामुळे मीन राशीच्या लोकांना आर्थिक त्रास होऊ शकतो. त्यामुळे आर्थिक स्थिती कमकुवत होईल. तुमच्या रागीट स्वभावामुळे तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत किंवा घरातील व्यक्तींसोबत एखाद्या गोष्टीवरून मतभेद होऊ शकतात. त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवा. नोकरीत सहकाऱ्यांची साथ अजिबात मिळणार नाही. त्यामुळे जपून प्रत्येक गोष्ट करावी लागेल.
(येथे दिलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)