Nakshatra Change Of Saturn: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह वेळोवेळी नक्षत्र परिवर्तन आणि राशी परिवर्तन करतात, ज्याच्या प्रभावाने १२ राशींच्या व्यक्तींवर परिणाम पाहायला मिळतो. शनिदेखील वेळोवेळी नक्षत्र परिवर्तन करतो, ज्याचा शुभ किंवा अशुभ परिणाम काही राशींवर पाहायला मिळतो. पुढच्या दोन महिन्यात शनि नक्षत्र परिवर्तन करणार आहे. सध्या शनि गुरू ग्रहाच्या नक्षत्रामध्ये उपस्थित असून तो लवकरच राहूच्या शततारका नक्षत्रामध्ये प्रवेश करेल. या नक्षत्रामध्ये शनि २६ डिसेंबरपर्यंत राहील. शनिचे हे नक्षत्र परिवर्तन काही राशींच्या व्यक्तींसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शनि करणार शततारका नक्षत्रामध्ये प्रवेश

शततारका नक्षत्राला २७ नक्षत्रांमध्ये २४ वे स्थान प्राप्त आहे. या नक्षत्राचा स्वामी राहू ग्रह आहे. तसेच हे नक्षत्र कुंभ राशी अंतर्गत असते. या नक्षत्राला शतभिषा नक्षत्रदेखील म्हटले जाते.

मेष

मेष राशीच्या व्यक्तींना शनिचे नक्षत्र परिवर्तन खूप शुभ परिणाम देईल. या काळात तुमच्या व्यवसायात वाढ होईल. तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. नोकरीमध्ये प्रमोशन होईल. विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळेल. आरोग्य चांगले राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. धार्मिक कार्यात मन रमेल, मित्रांसह फिरायला जायचा प्लॅन कराल.

वृषभ

वृषभ राशीच्या व्यक्तींनाही शनिचे नक्षत्र परिवर्तन खूप लाभदायी सिद्ध होईल. या काळात धनु राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात आनंदी आनंद येईल. या काळात तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा.

हेही वाचा: शुक्र, बुध अन् मंगळ देणार बक्कळ पैसा; राशी परिवर्तन होताच ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींच्या दारी नांदणार लक्ष्मी

धनु

शनिचे नक्षत्र परिवर्तन धनु राशीच्या व्यक्तींसाठी खूप फायदेशीर ठरेल. या काळात तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल. जोडीदाराची साथ मिळेल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळवाल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नोकरी मिळेल. समाजात मानसन्मान, यश-कीर्ती वाढेल. या काळात तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल. समाजात तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि कुटुंबात सुख-शांतीचे वातावरण असेल.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Transit of saturn 85 days saturn will give money will come in the of three zodiac signs sap