ज्योतिषशास्त्रानुसार एका ठराविक अंतराने ग्रह गोचर करत असतात. ज्याचा परिणाम मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर दिसतो. हा बदल काही व्यक्तींसाठी सकारात्मक तर काहींसाठी नकारात्मक ठरु शकतो. अशातच आता धन आणि समृद्धी देणारा शुक्र ग्रहाने आज १२ मार्च रोजी मेष राशीत प्रवेश केला आहे. ज्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसणार आहे. परंतु त्यापैकी ३ राशी अशा आहेत, ज्यांना या काळात अचानक आर्थिक लाभ होण्यासह, प्रगती होण्याचीही शक्यता आहे. तर त्या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मेष राशी –

मेष राशीच्या लोकांसाठी शुक्र ग्रहाचे गोचर शुभ सिद्ध होऊ शकते. कारण तुमच्या गोचर कुंडलीच्या सप्तमेषचा कारक शुक्र लग्नात विराजमान आहे. त्यामुळे काही प्रकरणांमध्ये ते अस्थिरही होऊ शकतात. तसेच, या काळात तुम्ही चिडखोर होऊ शकता. तर काही लोक तुमची बदनामीही करू शकतात. मात्र, या काळात तुमची संपत्ती वाढू शकते आणि तुम्ही पैसेही वाचवू शकता. या काळात तुम्हाला चांगल्या नोकरीच्या ऑफर मिळण्याची शक्यता आहे. तर अविवाहितांना चांगली स्थळ येण्याची शक्यता आहे. भागीदारीतील कामे फायदेशीर ठरू शकतात आणि लव्ह लाईफमध्ये सुरू असलेल्या अडचणी कमी होण्याचीही दाड शक्यता आहे.

हेही वाचा- ‘विपरीत राजयोग’ बनल्याने ‘या’ राशी होणार श्रीमंत?; मंगळदेव मिळवून देणार बक्कळ पैसा कमवण्याची संधी

सिंह राशी –

सिंह राशीतील लोकांसाठी शुक्राचे गोचर शुभ आणि फलदायी ठरू शकते. कारण शुक्र ग्रह तुमच्या राशीतून नवव्या स्थानी गोचर करणार आहे. यावेळी तुम्हाला नशीबाची साथ मिळू शकते. या काळात नोकरदार वर्गाचे प्रमोशन आणि पगारवाढ होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर बेरोजगारांनाही नोकऱ्या मिळू शकतात आणि अविवाहितांना स्थळ येऊ शकतात. तर काहींना अपत्य प्राप्ती होण्याची शक्यता आहे. याशिवाय तुमचा परदेश प्रवासही होऊ शकतो.

हेही वाचा- १३ आणि १५ मार्चला ‘या’ राशींचे नशिब पालटणार? मंगळ आणि सूर्य एकत्र देणार प्रचंड धनलाभाची संधी

कर्क राशी –

कर्क राशीच्या लोकांसाठीही शुक्र ग्रहाचे गोचर लाभदायक ठरू शकते. कारण शुक्र ग्रह तुमच्या गोचर कुंडलीत आयेशा आणि कर्मेश आहे. कारण शुक्र ग्रह तुमचा सुखेश आणि आयेश आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला नवीन नोकरीच्या चांगल्या संधी मिळू शकतात. तसेच, वरिष्ठ अधिकाऱ्याशी तुमचे मतभेद दूर होऊ शकतात. त्याचबरोबर तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीचा लाभही मिळू शकतो. शिवाय तुम्हाला मान-सन्मान मिळू शकतो आणि पैशांची बचतही होऊ शकते. प्रशासन आणि राजकारणाशी संबंधित लोकांसाठी हा काळ चांगला असू सकतो. या काळात तुम्ही वाहने आणि मालमत्ता देखील खरेदी करू शकता. तुमचे अडकलेले पैसेही मिळू शकतात पण आळस टाळावा लागेल.

(टीप – येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)