Trigrahi Yog 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, मार्च महिला खूप खास असणार आहे. कारण- या महिन्याच्य अखेरीस विविध ग्रह राशिबदल करणार आहेत, ज्याचा परिणाम १२ राशींच्या लोकांवर दिसून येईल. २९ मार्चपासून मीन राशीत अनेक ग्रह प्रवेश करणार आहेत. २९ मार्च रोजी न्यायदेवता शनी, त्याच्या मूळ त्रिकोण राशीतून म्हणजे कुंभ राशीतून गुरूच्या मीन राशीत प्रवेश करील, जिथे सूर्य, शुक्र, बुध व राहू आधीच स्थिर आहेत. परंतु, या ग्रहांमध्ये शुक्र, राहूची मीन राशीतील युती खूप महत्त्वाची मानली जाते. या तिन्ही ग्रहांच्या युतीमुळे त्रिग्रही राजयोग तयार होत आहे. मीन राशीतील या राजयोगाच्या निर्मितीमुळे काही राशींना सर्वाधिक लाभ मिळणार आहेत. पण, कोणत्या राशींना हे लाभ मिळतील ते जाणून घेऊ…
त्रिग्रही राजयोग ‘या’ तीन राशींसाठी ठरेल फलदायी (Trigrahi Yog In Meen Rashi 2025)
वृषभ (Taurus)
त्रिग्रही योग वृषभ राशीच्या लोकांसाठी फलदायी ठरू शकतो. या काळात वृषभ राशीच्या लोकांच्या प्रलंबित इच्छा पूर्ण होऊ शकतात. कुटुंबातील सदस्यांबरोबर सुरू असलेले वाद संपतील आणि आरोग्यही चांगले राहील. समाजात आदर वाढेल. यासह तुम्हाला नोकरी आणि व्यवसायातही खूप फायदे मिळू शकतात. पदोन्नतीसह पगार वाढण्याची शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती चांगली राहणार आहे. नशीब तुमच्या बाजूने असेल, तर उत्पन्नाचे अनेक मार्ग खुले होऊ शकतात. तुमच्या जोडीदाराबरोबर तुमचा वेळही चांगला जाईल.
कुंभ (Aquarius)
मीन राशीतील त्रिग्रही योग कुंभ राशीच्या लोकांसाठी शुभ ठरू शकतो. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांच्या आयुष्यात आनंदाचे अनेक क्षण येऊ शकतात. शनी देव मीन राशीतच स्थिर असल्याने कुंभ राशीच्या लोकांच्या कुंडलीत शनीच्या साडेसातीचा शेवटचा टप्पा चालू राहील. अशा परिस्थितीत तुमचे जीवन हळूहळू पुन्हा रुळावर येऊ शकते. तुमच्या जीवनातील आर्थिक संकट संपुष्टात येऊ शकते. सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेऊ शकता. त्यासह तुमच्या मेहनतीच्या जोरावर तुम्ही अनेक क्षेत्रांत यश मिळवू शकता. तुम्ही स्वतःचे आत्मपरीक्षण करून स्वतःमध्ये विविध बदल घडवू शकाल. त्यामुळे तुम्हाला यश मिळू शकते. तुमच्या नेतृत्वकौशल्यांमध्ये झपाट्याने वाढ होईल, ज्यामुळे नोकरी, तसेच व्यवसायात मोठे फायदे मिळू शकतात.
मिथुन (Gemini)
त्रिग्रही योग मिथुन राशीच्या लोकांसाठीअनुकूल ठरू शकतो. या काळात मिथुन राशीच्या लोकांना खूप फायदे मिळू शकतात. तुम्ही प्रत्येक क्षेत्रात अपार यश मिळवू शकाल. कामाच्या ठिकाणी तुम्ही करीत असलेल्या कामाचे खूप कौतुक होऊ शकते. त्यामुळे जीवनात येणाऱ्या अनेक समस्या सोडवता येऊ शकतात. व्यावसायिक क्षेत्रातील लोक वडिलोपार्जित मालमत्तेचा विस्तार करण्यासाठी गुंतवणूक करू शकतात. त्यातून तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. भागीदारीत केलेल्या व्यवसायातही तुम्हाला नफा मिळू शकतो. शारीरिक आणि मानसिक ताण बऱ्याच प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.