Trigrahi Yog 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, नऊ ग्रह विशिष्ट कालावधीनंतर राशिबदल करतात; ज्याचा परिणाम १२ राशींच्या लोकांच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे निश्चितच होत असतो. या ग्रहांमध्ये शुक्र आणि राहू यांचा समावेश आहे, जे एका कालावधीनंतर राशिबदल करतात. त्यात शुक्र २८ जानेवारीपासून मीन राशीत विराजमान होत आहे; तर चंद्र फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच १ तारखेला मीन राशीत प्रवेश करील. शुक्र, राहू व चंद्र यांच्या युतीमुळे त्रिकोणी युती तयार होत आहे. या योगाच्या निर्मितीमुळे सर्व १२ राशींच्या लोकांच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे परिणाम होईल; परंतु त्यापैकी तीन राशी अशा आहेत की, त्या राशींच्या लोकांना याचा सर्वाधिक फायदा होणार आहे. चला तर त्या राशी कोणत्या ते जाणून घेऊ…
वृषभ
त्रिग्रही योगामुळे वृषभ राशीच्या लोकांना भरपूर फायदे मिळणार आहेत. या राशीच्या लोकांना व्यवसाय आणि नोकरीत खूप फायदे मिळू शकतात. मित्रपरिवाराबरोबर त्यांना संस्मरणीय क्षण व्यतीत करता येऊ शकतात. समाजात मिळणारा आदर आणि सन्मान झपाट्याने वाढू शकतो. भौतिक सुखाची प्राप्ती होऊ शकते. तुमच्या भावा-बहिणींबरोबरही तुमचा वेळ चांगला जाऊ शकतो. त्यासोबतच तुमच्या आईबरोबरचे तुमचे नातेसंबंध सुधारतील. कोर्ट केसेसमध्ये यश मिळू शकते. आनंदाचे अनेक क्षण तुमच्या वाट्याला येऊ शकतात.
मिथुन
त्रिग्रही योग मिथुन राशीच्या लोकांसाठीही खूप फायदेशीर ठरू शकतो. या राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी प्रचंड यश आणि प्रगती साधता येऊ शकते. तुमच्या सर्जनशीलतेने तुम्ही चांगले निर्णय घेऊ शकाल. त्यासह तुमच्या सहकाऱ्यांबरोबरचे तुमचे संबंध सौहार्दपूर्ण असतील. तुम्हाला नोकरीच्या नवीन संधी मिळू शकतात. त्यासह तुमचा कामाच्या निमित्ताने परदेश प्रवास घडू शकतो. आयात-निर्यातीच्या बाबतीत तुम्हाला यश मिळू शकेल. तुमच्या आयुष्यात आनंदाचे क्षण येतील आणि त्यामुळे तुमचे मानसिक व शारीरिक आरोग्य निरोगी राहण्यास मदत होऊ शकते.
कन्या
त्रिग्रही योग कन्या राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. आर्थिक परिस्थिती चांगली राहू शकते. तसेच जर तुम्ही अविवाहित असाल, तर लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. पैशांशी संबंधित काही मोठे निर्णय तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला तुमच्या पालक, शिक्षक आणि मार्गदर्शक यांच्याकडून पूर्ण सहकार्य मिळू शकेल. त्याशिवाय तुमचे जीवन आनंदी होणार आहे. या काळात लग्नाचे योग आहेत.