Trigrahi Yog 2025 : ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य मालिकेत सर्व ग्रह एका ठराविक कालवधीनंतर राशी परिवर्तन करतात. त्यांची चाल आणि गोचरचा सर्व राशींवर परिणाम दिसून येतो. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा एखादा ग्रह गोचर करून दुसऱ्या ग्रहाबरोबर युती निर्माण करतो तेव्हा राजयोग निर्माण होतो, जो इतर राशींसाठी शुभ मानला जातो.
ज्योतिषशास्त्रानुसार मार्च २०२५ मध्ये एक मोठी संधी येणार आहे जेव्हा गुरू की राशी मीन मध्ये राजा सूर्य, बुध आणि शनि यांची युती निर्माण होणार आहे. या तीन शक्तीशाली ग्रह एकत्र आल्याने त्रिग्रही योग निर्माण होईल. या सर्व योग सर्व राशींच्या लोकांसाठी फायद्याचे ठरू शकते आणि अडकलेले कार्य पूर्ण होऊ शकते जाणून घेऊ या त्या तीन नशीबवान राशी कोणत्या?
मीन राशी (Meen Rashi)
या राशीच्या लोकांसाठी हा योग खूप खास आहे. त्रिग्रही योग निर्माण झाल्याने या लोकांचा आत्मविश्वास वाढेन. नोकरी व्यवसायात चांगली प्रगती करतील. हे लोक त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात पुढे जाईन आणि जोडीदाराचा या लोकांना भरपूर साथ मिळेल. हा योग निर्माण झाल्याने हे लोक नवीन प्रोजेक्टवर काम सुरू करू शकतात. या लोकांना आकस्मिक धनलाभ होऊ शकतो.
धनु राशी (Dhanu Rashi)
वैदीक शास्त्रानुसार, या लोकांच्या कुंडलीमध्ये हा योग चौथ्या स्थानी निर्माण होत आहे. यामुळे या लोकांच्या आर्थिक स्थितीवर थेट परिणाम दिसून येईल. या दरम्यान हे लोक जो निर्णय घेतील त्यात त्यांना यश प्राप्त होऊ शकते. कामाच्या ठिकाणी हे लोक टारगेट पूर्ण करू शकतात ज्यामुळे या लोकांचे बॉसकडून कौतुक केले जाईल. या लोकांच्या घरी वाहनाची आगमन होऊ शकतात.
मिथुन राशी (Mithun Rashi)
मिथुन राशीच्या लोक नोकरी बदलण्याचा विचार करत असेल तर त्यांच्यासाठी मार्च एक उत्तम महिना आहे. त्यांना उत्तम पॅकेजबरोबर चांगल्या जॉबचे ऑफर लेटर मिळू शकते. बेरोजगार लोकांना सुद्धा नोकरीची संधी मिळू शकते. व्यवसायात प्रगती होऊ शकते. पार्टनरशिपमध्ये काम करणाऱ्या लोकांना नफा मिळू शकतो आणि नवीन प्रोजक्टवर काम करण्याची संधी मिळू शकते.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)