Trigrahi Yog 2024 : ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक वेळेनंतर राशी बदलतात ज्याचा शुभ आणि अशुभ परिणाम राशीचक्रातील १२ राशींच्या लोकांवर पडतो. कुंभ राशीमध्ये तीन ग्रहांमुळे त्रिग्रही योग निर्माण होणार आहे. या योगमुळे काही राशीच्या लोकांना शुभ फळ मिळण्याची शक्यता आहे.
कुंभ राशीमध्ये शनि आधीच विराजमान आहे. ७ मार्चला शुक्र ग्रहाने सुद्धा कुंभ राशीत प्रवेश केला आहे आणि आता १५ मार्चला मंगळ ग्रह कुंभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे. तिन्ही ग्रह एकत्र आल्यामुळे त्रिग्रही योग दिसून येईल. या तीन मोठ्या ग्रहांची महायुतीचा चांगला परिणाम काही राशींवर होणार आहे. या राशींच्या आयुष्यात अनेक मोठे बदल दिसून येईल. या लोकांना सर्वत्र प्रगतीचे मार्ग दिसून येईल. त्या राशी कोणत्या, चला तर जाणून घेऊ या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मेष

मेष राशीच्या लोकांना मंगळ, शुक्र आणि शनिच्या युती फायदेशीर ठरू शकते. मेष राशीच्या लोकांसाठी ही युती पैसे कमावण्याचे नवीन स्त्रोत निर्माण करण्यास मदत करेन. जे लोकं व्यवसाय करतात त्यांच्या नशीब पालटू शकते. या लोकांना गुंतवणूक करेन त्या ठिकाणी नफा मिळू शकतो. नवीन संधी मिळू शकतात. या लोकांचे नशीब बदलू शकते.

हेही वाचा : Chandra Grahan on Holi 2024 : १०० वर्षानंतर होळीच्या दिवशी वर्षातले पहिले चंद्र ग्रहण, ‘या’ तीन राशीच्या लोकांचे नशीब पालटणार

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांसाठी मंगळ, शुक्र आणि शनिची ही महायुती शुभ ठरू शकते. या राशीच्या लोकांचे नशीब चमकू शकते. हे लोकं जे पण काम करेन त्यांना भरघोस यश मिळेल. नवीन काम सुरू करण्यासाठी हा काळ उत्तम आहे. थांबलेली कामे पूर्ण होतील. नातेसंबंधांमध्ये सुधारणा दिसून येईल. जोडीदाराबरोबरची नाराजी दूर होऊ शकते. हा काळ वृषभ राशीच्या लोकांसाठी उत्तम राहणार.

मकर

मकर राशीच्या लोकांसाठी मंगळ, शुक्र आणि शनिची महायुती आनंद घेऊन येईल. या लोकांच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतील. पती पत्नीच्या नातेसंबंधांमध्ये गोडवा निर्माण होईल. आरोग्याच्या समस्या दूर होतील. करिअरमध्ये या लोकांना नवीन संधी आणि पदोन्नती होण्याची शक्यता आहे. मकर राशीच्या लोकांचे नशीब पालटू शकते.