ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा जेव्हा एखादा ग्रह राशी बदलतो किंवा कोणत्याही ग्रहाशी संयोग करतो तेव्हा त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होतो. मंगळाचं अधिपत्य असलेल्यात मेष राशीमध्ये त्रिग्रही योग तयार होणार आहे. वैदिक पंचांगानुसार एप्रिल महिन्यात तीन मोठे ग्रह बुध, राहू आणि सूर्य मेष राशीत प्रवेश करणार आहेत. हे तीन ग्रह मिळून त्रिग्रही योग तयार होतील. बुध ग्रहाने ८ एप्रिल रोजी मेष राशीत प्रवेश केला आहे. आता १२ एप्रिल रोजी मायावी ग्रह राहूने मेष राशीत प्रवेश केला आहे. काही काळानंतर म्हणजेच १४ एप्रिल रोजी सूर्य देखील मेष राशीत प्रवेश करेल. ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशीमध्ये या तीन ग्रहांच्या उपस्थितीमुळे त्रिग्रही योग तयार होईल. चला जाणून घेऊया कोणत्या राशींना या योगांचा फायदा होऊ शकतो…
मिथुन: त्रिग्रही योग तयार झाल्याने मिथुन राशीच्या लोकांना चांगला पैसा मिळू शकतो. कारण तुमच्या अकराव्या स्थानात त्रिग्रही योग तयार होईल. या स्थानाला उत्पन्न आणि लाभाचे स्थान म्हणतात. या काळात तुमचे उत्पन्न वाढू शकते. तसेच उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होऊ शकतात. व्यवसायात गुंतवणुकीसाठीही हा काळ अनुकूल आहे. मात्र, तुमच्या कुंडलीत राहू आणि सूर्य देव कोणत्या स्थितीत आहेत, हे पाहावं लागेल.
कर्क: करिअर आणि नोकरीचे घर असे म्हटल्या जाणार्या दशम भावात त्रिग्रही योग तयार होईल. यावेळी तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. तसेच तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला पदोन्नती किंवा वेतनवाढ मिळू शकते. व्यवसायात लाभाचे योग असून नवीन करार निश्चित होऊ शकते. याचा तुम्हाला भविष्यात फायदा होऊ शकतो. पण कुंडलीत राहू आणि सूर्याची स्थिती पाहणे खूप महत्त्वाचे आहे.
Budh Uday: अस्ताला गेलेल्या बुध ग्रहाचा उदय, या राशींना मिळणार चांगले परिणाम
सिंह: तुमच्या नवव्या भावात त्रिग्रही योग तयार होईल. या स्थानाला भाग्यस्थान म्हणतात. यावेळी तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. रखडलेली कामे होतील. तसेच, तुम्हाला व्यवसायात अपेक्षित यश मिळू शकते. विद्यार्थ्यांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. या काळात स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊ शकता. सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे. त्यामुळे कुंडलीत सूर्यदेवाचे स्थान पाहणे खूप महत्त्वाचे आहे.