Tri Grahi Yog 2023: ज्योतिषशास्त्रानुसार, नवग्रह वेळोवेळी एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. या राशी परिवर्तनाचा परिणाम प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे होत असतो. अशातच ३ ऑक्टोबर रोजी मंगळाने तूळ राशीत गोचर केले होते. या राशीमध्ये केतू ग्रह आधीपासूनच विराजमान आहे. तसेच १५ ऑक्टोबरला चंद्र तूळ राशीत प्रवेश करणार आहे. अशा स्थितीत तूळ राशीमध्ये त्रिग्रही योग तयार होणार आहे. तीन ग्रहांच्या युतीने तयार झालेला हा योग अत्यंत शुभ मानला जात आहे. ज्योतिषशास्त्रानुसार १७ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजून १९ मिनिटांनी चंद्र वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. यावेळी त्रिग्रही योग भंग होणार आहे. त्रिग्रही योगाची निर्मिती प्रत्येक राशीवर कोणत्या ना कोणत्या प्रकारे परिणाम करेल. पण ३ राशी अशा आहेत ज्यांना या योगामुळे प्रचंड आर्थिक लाभ होऊ शकतो. तर या भाग्यवान राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊ या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा