Trigrahi Yog on Dhanteras 2024 : यंदा धनत्रयोदशी २९ ऑक्टोबर रोजी देशभरात साजरी केली जाणार आहे. या दिवशी धन्वतरि देवाची पूजा केली जाते. याला आरोग्य दैवत म्हणतात. धनत्रयोदशीच्या दिवशी कुबेर देव आणि देवी लक्ष्मीची सु्द्धा पूजा करण्याची परंपरा आहे. या वर्षी धनत्रयोदशीच्या दिवशी १०० वर्षानंतर त्रिग्रही योग म्हणजेच त्रिपुष्कर योग, इंद्र योग वैधृति योग आणि उत्तरा फाल्गुनी नक्षत्राचे महासंयोग निर्माण होत आहे. या योगांचा प्रभाव राशिचक्रातील काही राशींवर दिसून येईल ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्थितीमध्ये प्रगती होऊ शकते.
धनत्रयोदशी शुभ योग
यंदा धनत्रयोदशीच्या दिवशी १०० वर्षांनतर दुर्लभ संयोग निर्माण होत आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी त्रिग्रही योग, त्रिपुष्कर योग, इंद्र योग, लक्ष्मी नारायण योग, शश महापुरुष राजयोग असे पाच शुभ संयोग निर्माण होत आहे. या दिवशी पूजा आणि खरेदी केल्याने फायदा होऊ शकतो.
इंद्र योग – २८ ऑक्टोबर, सकाळी ६ वाजून ४८ मिनिटांनी सुरू होईल तर २९ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ७ वाजून ४८ मिनिटांनी समाप्त होईल.
त्रिपुष्कर योग – २८ तारखेला सकाळी ६ वाजून ३१ मिनिटांनी सुरू होईल आणि २९ तारखेला सकाळी १० वाजून ३१ मिनिटांनी समाप्त होईल.
लक्ष्मी-नारायण योग – धनत्रयोदशीच्या दिवशी वृश्चिक राशीमध्ये शुक्र आणि बुध एकत्र विराजमान होणार. त्यामुळे लक्ष्मी नारायण योग निर्माण होईल.
कर्क राशी
या दिवशी निर्माण होणारा योग कर्क राशीसाठी अत्यंत फायद्याचा ठरू शकतो. या लोकांना अप्रत्यक्ष लाभ मिळू शकतो. कुटुंबाचे सहकार्य लाभेल. या दरम्यान नवीन वस्तु खरेदी करू शकता.
तुळ राशी
तुळ राशीचे लोक व्यवसायात मोठे व्यव्हार करू शकतात. म्हणजेच भविष्यात या लोकांना चांगला नफा मिळू शकतो. हे लोक जमीन संपत्तीसंबंधित प्रकरणे सोडवणार आणि कामाच्या ठिकाणी यांच्यावर नवीन जबाबदारी सोपवली जाईल ज्यामुळे यांचा मान सन्मान वाढेन.
धनु राशी
धन राशीच्या लोकांसाठी हा काळ कमाईत वृद्धी आणणारा असेल. नवीन कमाईचे स्त्रोत वाढतील आणि यांना आर्थिक लाभ होईल. या दरम्यान या लोकांचे विदेश यात्रेचे योग जुळून येतील. जे लोक नोकरीच्या शोधात आहे, त्यांना नोकरीचे योग जुळून येतील. विशेषत:सरकारी नोकरीसाठी हा काळ उत्तम आहे.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)