ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा मानवी जीवनावर परिणाम होतो. ठराविक कालावधीनंतर ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतात. काही ग्रह धीम्या गतीने परिवर्तन करतात. शनि ग्रह एका राशीत अडीच वर्षापर्यंत राहतो. तर चंद्र दर सव्वा दोन दिवसांनी राशी बदलत असतो. त्यामुळे एका राशीत कधी कधी दोन किंवा त्यापेक्षा अधिक ग्रह येतात. जेव्हा एखादा ग्रह राशी बदलतो तेव्हा त्याचा सर्व १२ राशींच्या लोकांवर परिणाम होतो. ज्योतिष शास्त्रानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी १४ जानेवारीला त्रिग्रही योग तयार होणार आहे, ज्याचा थेट परिणाम व्यक्तीच्या जीवनावर होतो. मकर संक्रांतीच्या दिवशी मकर राशीत त्रिग्रही योग असणार आहे. शनि ग्रह आधीच मकर राशीत आहे. ५ जानेवारीला बुध सुद्धा या राशीत पोहोचला आहे आणि त्यानंतर १४ जानेवारीला सूर्य देखील मकर राशीत प्रवेश करेल. मकर राशीत शनि, सूर्य आणि बुध यांच्या संयोगाने त्रिग्रही योग तयार होईल, हा योग शुभ मानला जात नाही. कारण शनि आणि सूर्य एकमेकांचे शत्रू आहेत. अशा परिस्थितीत चार राशींच्या आयुष्यात मोठे बदल होऊ शकतात, जाणून घेऊयात.
कन्या : या राशीच्या लोकांनी आरोग्याबाबत जागरूक राहणे आवश्यक आहे. पोट आणि फुफ्फुसांशी संबंधित समस्या होऊ शकते. कोणत्याही मालमत्तेचे व्यवहार करताना काळजी घ्या. वाहन जपून चालवा, अन्यथा अपघात होण्याची शक्यता आहे. पालकांच्या तब्येतीची चिंता असू शकते. मुलाच्या बाजूने तणाव असू शकतो. हा योग विद्यार्थ्यांच्या जीवनात गोंधळ निर्माण करू शकतो. त्यांचे लक्ष अभ्यासातून विचलित होण्याची शक्यता आहे.
वृषभ : नवव्या भावात सूर्याची उपस्थिती असल्याने कुटुंबात कलह होण्याची शक्यता आहे. वडिलांसोबतचे संबंध बिघडू शकतात. कुटुंबात विनाकारण वाद निर्माण होऊ शकतात. वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे आणि ज्योतिष शास्त्रानुसार शुक्र आणि सूर्य ग्रह यांच्यात शत्रुत्वाची भावना आहे. त्यामुळे पालकांच्या आरोग्याची काळजी घ्या. या काळात तुम्हाला तुमच्या व्यावसायिक जीवनात काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. खर्च वाढू शकतो. यासोबतच या काळात आर्थिक संकटालाही सामोरे जावे लागू शकते.
या दिवशी घेतलेल्या पैशांची परतफेड केल्यास डोक्यावर कर्ज होणार नाही; जाणून घ्या
मिथुन : आठव्या भावात सूर्य आणि शनीच्या उपस्थितीमुळे आरोग्यासंबंधी समस्या उद्भवू शकतात. तुम्ही लांबच्या प्रवासालाही जाऊ शकता. मिथुन राशीवर बुध ग्रहाचे राज्य आहे आणि ज्योतिष शास्त्रानुसार बुध ग्रहाचे शनिदेवाशी वैर आहे. त्यामुळे जोडीदारासोबत मतभेद होऊ शकतात. व्यवसायात गुंतलेले असाल तर काळजी घेणे आवश्यक आहे. या काळात तुम्ही नोकरीही बदलू शकता. कोणत्याही मालमत्तेच्या व्यवहारात सावधगिरी बाळगा, अन्यथा नुकसान होऊ शकते.
धनु : हा काळ तुमच्यासाठी शुभ म्हणता येणार नाही. कुटुंबातील तणावाचे वातावरण तुम्हाला त्रास देत राहील. या काळात तुमची संचित संपत्तीही कमी होईल. पोट किंवा रक्तदाबाशी संबंधित समस्या असू शकतात. जर तुम्ही शनि आणि सूर्य ग्रहाशी संबंधित कोणताही व्यवसाय करत असाल तर तुम्हाला थोडी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. वैवाहिक जीवनात काही तणाव असू शकतो.