हिंदू धर्मात गुरुपौर्णिमेच्या सणाला विशेष महत्त्व आहे. हिंदू धर्मात गुरूला देवा इतकेच महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा हा सण साजरा केला जातो. यंदा गुरुपौर्णिमा १३ जुलैला आहे. या वर्षी गुरुपौर्णिमेला सूर्य, बुध आणि शुक्र हे तिन्ही ग्रह मिथुन राशीत येणार आहेत. मिथुन राशीमध्ये तयार झालेला हा त्रिग्रही योग अत्यंत शुभ मानला जात आहे. तीन राशीच्या लोकांना याचा फायदा होणार आहे. जाणून घेऊया या गुरुपौर्णिमेला कोणत्या राशींना या योगामुळे चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे.
- मिथुन
ज्योतिष शास्त्रानुसार मिथुन राशीमध्ये त्रिग्रही योग तयार होत आहे. या राशीच्या लोकांना या योगातून नशिबाची साथ मिळेल. या काळात काही चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर करिअरमध्येही प्रगती होऊ शकते. गुरुपौर्णिमेच्या दिवशी या योगामुळे उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच, या काळात अनावश्यक खर्च कमी होतील.
Monthly Horoscope, July 2022: जुलै महिन्यात पाच ग्रह बदलणार राशी; जाणून घ्या तुमचे मासिक राशिभविष्य
- वृषभ
या शुभ संयोगाने या राशीच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक परिणाम दिसून येतील. या दरम्यान, एखाद्याला दिलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. त्याच वेळी, एखाद्याकडून पैसे मिळू शकतात. हा काळ तुमच्यासाठी शुभ राहील. तुमचा आदर वाढेल. त्याचबरोबर या राशीच्या अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात.
- धनु
या वर्षीची गुरुपौर्णिमा धनु राशीच्या लोकांसाठी खूप खास असणार आहे. नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली बातमी मिळू शकते. त्याचबरोबर सरकारी नोकऱ्यांच्याही शक्यता निर्माण होत आहेत. या काळात आर्थिक स्थिती सुधारेल.
(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)