17th September Rashi Bhavishya & Panchang : आज १७ सप्टेंबर २०२४ रोजी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथी आहे. चतुर्दशी तिथी मंगळवारी रात्री ११ वाजून ४५ पर्यंत राहील, त्यानंतर पौर्णिमा तिथीस प्रारंभ होईल. तसेच मंगळवारी दुपारी १ वाजून ५५ मिनिटांपर्यंत धृती योग राहील. तसेच दुपारी १ वाजून ५३ मिनिटांपर्यंत शततारका नक्षत्र राहील. आज राहू काळ दुपारी ३ वाजता सुरु होणार ते संध्याकाळी ४ वाजून ३० मिनिटांपर्यंत असणार. याशिवाय आज आपल्या लाडक्या गणरायाचे विसर्जन होणार आहे. म्हणजेच आज अनंत चतुर्दशी आहे. बाप्पा मेष ते मीन या १२ राशींना कसा आशीर्वाद देऊन जाणार हे आपण जाणून घेऊ या…

१७ सप्टेंबर पंचांग व राशीभविष्य :

मेष:- भावनिक गुंतागुंतीत अडकून राहू नका. मनातील इच्छा पूर्ण होईल. नोकरीत स्वत:च्या मुद्यावर ठाम रहा. अनोळखी व्यक्तीचे सहकार्य लाभेल. हाताखालील लोक विश्वासू मिळतील.

Surya Shani Kendra Drishtisun and saturn 90 degree these zodiac sign will be shine
सूर्य आणि शनीची केंद्र दृष्टीमुळे ४ डिसेंबरपासून या राशींचे नशीब चमकणार! आयुष्यात आनंदी आनंद
vastu shastra Vastu tips for positive energy in home marathi
Vastu Tips : वास्तुशास्त्रानुसार घर कसे असावे? बेडरुम,…
no alt text set
ग्रहांचा सेनापती मंगळ होणार वक्री, नववर्षाच्या सुरुवातीला या राशीच्या लोकांची होणार चांदीच चांदी, तुमची रास आहे का या?
23 November Rashi Bhavishya In Marathi
२३ नोव्हेंबर पंचांग: आज कोणाला मिळेल भाग्याची साथ तर कोणाची आर्थिक घडी सुधारणार? वाचा तुमचा शनिवार कसा जाणार
venus and saturn yuti 2024
२०२५ पर्यंत ‘या’ राशींचा सुरू होईल सुवर्णकाळ; शनी- शुक्राच्या संयोगाने नोकरी, व्यवसायात प्रगती अन् मिळणार बक्कळ पैसा!

वृषभ:- फसवणुकीपासून सावध रहा. पैशाचा विनिमय विचारपूर्वक करावा. मोठा निर्णय घेताना एकवार पुन्हा विचार करावा. मित्रांच्या भेटीचे योग. विनाकारण शंका घेऊ नका.

मिथुन:- मित्र परिवाराच्या स्नेहाला जपा. व्यावसायिक उन्नती होईल. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगा. तुमच्या कृतीला विरोध होऊ शकतो. कौटुंबिक वातावरण सामान्य राहील.

कर्क:- भावंडांची साथ मिळेल. कला जोपासत राहावे. अपेक्षित यशासाठी जोरात प्रयत्न करावेत. दूरचे प्रवास संभवतात. ईश्वरावरील श्रद्धा दृढ होईल.

सिंह:- जुनी कामे मार्गी लागतील. जवळच्या व्यक्तीचा सल्ला उपयोगी ठरेल. आजचा दिवस चांगला जाईल. व्यापारी वर्गाला नवीन अनुभवाला सामोरे जावे लागेल. कामे मनासारखी झाल्याने मन प्रसन्न राहील.

कन्या:- तुमचा करारी स्वभाव दाखवण्याची संधी मिळेल. नानाविध रंगांनी भरलेला दिवस. रूचकर भोजनाचा आस्वाद घ्याल. प्रलंबित कामे मार्गी लावाल. आहारावर नियंत्रण हवे.

तूळ:- कोणत्याही मुद्यावर संभ्रमित होऊ नका. ठामपणे निर्णय घ्या. आपली इतरांवर छाप पडेल. पोटाचे विकार त्रस्त करू शकतात. जोडीदाराशी मतभेदाची शक्यता.

वृश्चिक:- घरामध्ये मोठी खरेदी कराल. आजचा दिवस चांगला जाईल. कठीण कामे सुरळीत पार पडतील. मुलांची चिंता सतावेल. कोणत्याही प्रकारच्या वादात पडू नका.

धनू:- जन संपर्कातून लाभ होईल. कलेत प्राविण्य मिळवाल. आजचा दिवस संमिश्र जाईल. दिवसाच्या उत्तरार्धात चांगली बातमी मिळेल. मन प्रसन्न होईल.

मकर:- पैसे खर्च करताना विचार करावा. योग्य व्यक्तीच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्या. मित्रांचे मोलाचे सहकार्य लाभेल. काही वाद मिटवण्यासाठी प्रयत्नशील राहावे. हातातील कामे पार पडतील.

कुंभ:- स्वकर्तृत्वावर झेप घ्या. मित्रांचा सल्ला उपयोगी पडेल. क्षुल्लक समस्येतून मार्ग निघेल. वरिष्ठांशी जुळवून घ्यावे लागेल. दिवसाचा उत्तरार्ध दिलासादायक असेल.

मीन:- बोलताना पुढच्या-मागच्या गोष्टीचा विचार करावा. लाभाच्या संधी प्राप्त होतील. मानसिक स्वास्थ्य जपावे. कठीण कामे सुलभतेने होतील. अति तिखट पदार्थ खाऊ नका.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर