Dev Uthani Prabodhini Ekadashi Shubh Muhurta: कार्तिकी एकादशीला म्हणजेच देवउठनी एकादशीला भगवान विष्णू निद्रावस्थेमधून पुन्हा जागे होतात आणि शुभ कार्यांना, लग्न समारंभांना सुरूवात केली जाते. कार्तिकी एकादशीच्या दिवशी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तुळशी विवाह पार पडतात. तुळशीच्या लग्नानंतरचा कालावधी ज्योतिषशास्त्रानुसार काही राशींसाठी अत्यंत शुभ ठरू शकतो. विष्णूच्या कृपेने या राशींना माता लक्ष्मीचे आशीर्वादही लाभण्याचे प्रबळ योग आहेत. पंचांगानुसार तीन राशींसाठी धनप्राप्ती व प्रगतीचे हे योग तयार होत आहेत. २०२२ या वर्षातील शेवटचे दोन महिने या तीन राशींचे नशीब पालटण्यासाठी अत्यंत शुभ ठरू शकतात. कोणत्या आहेत या तीन राशी व त्यांना नेमका कसा लाभ होणार हे जाणून घेऊयात…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तुळशीच्या लग्नांनंतर ‘या’ राशींसाठी शुभ काळ…

कन्या

कन्या राशीला तुळशीच्या लग्नांनंतर शुभ वार्ता मिळण्याची दाट शक्यता आहे. देव उठनी एकादशीपासून कन्या राशीवर भगवान विष्णू व माता लक्ष्मीचा वरदहस्त कायम राहू शकतो. यामुळेच धनलाभाचे प्रबळ योग तयार होत आहेत. या शुभ कालावधीत तुमचे वैवाहिक आयुष्य सुधारण्यातही मोठी मदत मिळू शकते. तुमच्या आयुष्यात एक नवी व्यक्ती किंवा गोष्ट येण्याची शक्यता आहे, आपण विवाह इच्छुक असाल तर लग्न जुळण्याच्या दिशेने चार पाऊले पुढे जाता येईल. कोर्टाच्या खटल्यांमध्येही नशीब आपल्या बाजूने राहू शकते.

तूळ

तूळ राशीसाठी शेअर बाजारातून धनप्राप्तीचे संकेत आहेत. तुम्ही यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे असेल मात्र तुम्ही नीट तपासणी करून पैसे गुंतवल्यास नफा मिळण्याची शक्यता सर्वाधिक आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो पण या अडचणी तुमच्या प्रगतीसाठी खूप कामी येतील, उलट या अडचणीतूनच तुमचे ऑफिसमधील महत्त्व आणखी वाढण्याची शक्यता आहे. प्रेम संबंध सुधारण्यास हा काळ शुभ ठरेल.

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या व्यक्तीला नवी सुरुवात करण्याची संधी आहे. खाजगी किंवा करिअरच्या बाबतही आपण आजवर पळत आलेले नियम झुगारून पुढे जाण्याचा विचार करू शकता, यासाठी आवश्यक ती तयारी करण्याचा हा काळ असणार आहे. तुम्ही नव्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमचे कष्ट कमी होण्याची पूर्ण शक्यता आहे. वैवाहिक जीवनात कमी अधिक प्रमाणात कौटुंबिक कलह होऊ शकतात मात्र तुमच्या जोडीदाराची साथ लाभल्यास मानसिक शांतीवर परिणाम कमी होऊ शकतो.

Tulsi Vivah 2022: यंदा तुळशीचं लग्न कधी? कार्तिकी एकादशीची तारीख, शुभ मुहूर्त, पूजा विधी जाणून घ्या

(टीप- वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे, यातून अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाही)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tulsi vivaha dates muhurta which zodiac signs will get lot of money lakshmi blessing in last two months of 2022 svs