वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहणांना हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. ज्योतिष शास्त्रामध्ये असे सांगितले जाते की ग्रहणामुळे सर्व राशीच्या लोकांवर अंशतः किंवा पूर्णतः प्रभाव पडतो. म्हणूनच यावेळी विशेष काळजी घेण्यास सांगितले जाते. हिंदू कॅलेंडरनुसार, वर्षातील पहिले सूर्यग्रहण ३० एप्रिल २०२२ रोजी रात्री १२ वाजून १५ मिनिटे ते पहाटे ४ वाजून ७ मिनिटांपर्यंत राहील. त्यानंतर १५ दिवसांनी वर्षातील पहिले चंद्रग्रहण देखील होईल. २०२२ मध्ये एकूण ४ ग्रहणे होणार आहेत. यामध्ये दोन सूर्यग्रहण आणि दोन चंद्रग्रहणांचा समावेश असेल.
ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहणाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर सकारात्मक आणि नकारात्मकरित्या पडू शकतो. आज आपण जाणून घेऊया की कोणत्या राशीच्या लोकांना सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण यांचे सकारात्मक परिणाम मिळण्याची अपेक्षा आहे.
संध्याकाळच्या वेळी घरात झाडू मारण्यास का केली जाते मनाई? जाणून घ्या यामागील शास्त्रीय कारण
मेष :
२०२२ सालचे पहिले सूर्यग्रहण मेष राशीच्या लोकांसाठी खूप शुभ आहे कारण हे ग्रहण फक्त मेष राशीत होणार आहे. मेष राशीच्या लोकांवर ग्रहणाचा सकारात्मक परिणाम होण्याची अपेक्षा आहे. त्यांना व्यवसाय, करिअर, वैयक्तिक जीवनात यश मिळण्याची शक्यता आहे. कोणताही नवीन व्यवसाय किंवा जमीन इत्यादी गुंतवणुकीसाठी हा काळ अनुकूल राहील. यावेळी घरातील मोठ्यांचा सल्ला घ्यायला विसरू नका.
सिंह :
सिंह राशीच्या लोकांवर सूर्य आणि चंद्रग्रहण या दोन्हीचा चांगला प्रभाव दिसेल. या काळात लोकांचे आर्थिक संकट दूर होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी सर्वांचे सहकार्य मिळेल आणि तुम्हाला चांगली बढती मिळण्याची अपेक्षा आहे. गुंतवणूक आणि व्यवसायाशी संबंधित कामात यश मिळेल. जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल.
‘या’ राशींसाठी भाग्यवान आहे सोन्याची अंगठी; आनंदाच्या मार्गातील अडथळे होतात दूर
धनु :
या राशीच्या लोकांसाठी दोन्ही ग्रहणांचा प्रभाव फलदायी ठरेल. या काळात या लोकांसाठी करिअरचे नवीन दरवाजे उघडू शकतात. आर्थिक जीवनात अडकलेला पैसा मिळण्याची आशा आहे. यासोबतच लांबचा प्रवास होण्याची शक्यता असून प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होताना दिसत आहेत. मित्रांचे पूर्ण सहकार्य मिळेल, तसेच कोणताही निर्णय घेण्यापूर्वी घरातील सदस्यांचा सल्ला घ्यावा.
(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)