Shash And Malavya Rajyog: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांच्या गोचरमुळे अनेक शुभ योग आणि राजयोग तयार होतात. या राजयोगांचा थेट परिणाम मानवी जीवनावर होताना दिसतो. आता येत्या मार्च महिन्यात तब्बल ५०० वर्षांनी एकाच वेळी दोन राजयोग निर्माण होत आहेत. शुक्र आणि शनिदेव राजयोग निर्माण करणार आहेत. शनिदेव शश राजयोग निर्माण करत आहेत तर शुक्रदेव मालव्य राजयोग निर्माण करणार आहेत. या दोन राजयोगांच्या निर्मितीमुळे काही राशींच्या व्यक्तींना शुभ परिणाम मिळू शकणार आहेत. चला तर जाणून घेऊयात कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…

‘या’ राशी होणार श्रीमंत?

मिथुन राशी (Gemini) 

दोन राजयोगांची निर्मिती मिथुन राशींच्या लोकांसाठी शुभ ठरू शकते. या राशीताल लोकांना प्रत्येक कामात नशिबाची साथ मिळण्याची शक्यता आहे. या काळात व्यापाऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो. पैसे कमविण्याच्या अनेक संधी मिळू शकतात. परदेशात जाण्याची तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते. तुम्हाला पैसा आणि करिअरशी संबंधित बाबींमध्ये विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते.

2 January 2025 Rashi Bhavishya
३ जानेवारी पंचांग: नववर्षातील पहिली विनायक चतुर्थी! लाभ, इच्छापूर्ती ते आयुष्यात वाढेल गोडवा; वाचा तुमचा शुक्रवार कसा जाणार?
Shatgrahi Yog in meen 2025
आता नुसता पैसा; मार्चपासून मीन राशीत निर्माण होणार…
Cancer Yearly Horoscope 2025 in Marathi| Kark Rashi Bhavishya 2025 in Marathi
Cancer 2025 Rashi Bhavishya: २०२५ मध्ये लग्नाचा योग, पगारवाढ अन् … कर्क राशीला जानेवारी ते डिसेंबरपर्यंत ‘या’ मार्गे मिळू शकतं सुख
Shukra Nakshatra Gochar 2025 astrology
शनिच्या नक्षत्रात शुक्राचा प्रवेश, ४ जानेवारीनंतर ‘या’ राशींचे लोक होतील मालामाल,कमावतील चिक्कार पैसा
Guru Margi 2025
४ फेब्रुवारीपासून ‘या’ तीन राशींचे भाग्य चमकणार; गुरूची चाल देणार पैसा आणि प्रतिष्ठा
Due to Budhaditya Rajyoga in January
जानेवारीमध्ये बुधादित्य राजयोगामुळे या ४ राशीच्या लोकांना मिळणार नशीबाची साथ! सूर्य अन् बुधची होईल विशेष कृपा
Mangal rashi parivrtan 2024
पुढील ८४ दिवस मंगळ करणार मालामाल; ‘या’ तीन राशींचे लोक कमावणार बक्कळ पैसा
2 January 2025 Rashi Bhavishya In Marathi २ जानेवारी राशिभविष्य
2 January Horoscope: नववर्षाच्या दुसऱ्याच दिवशी नवीन संधी येणार चालून, कोणाला लाभ तर कोणाची रखडलेली कामे होतील पूर्ण, वाचा गुरूवारचे भविष्य
Saturn's Nakshatra transformation
२०२५ च्या सुरूवातीपासून ‘या’ तीन राशींना अनेक अडचणी येणार; शनीच्या नक्षत्र परिवर्तनाने आर्थिक समस्याही उद्भवणार

(हे ही वाचा : ७७ वर्षांनंतर मकर संक्रांतीला घडून येतोय ‘असा’ अद्भूत योग; श्रीमंत होतील ‘या’ राशीचे लोकं? भाग्यवान राशी कोणत्या? )

तूळ राशी (Libra)

शश राजयोग आणि मालव्य राजयोगाच्या निर्मितीमुळे तूळ राशीच्या लोकांना व्यवसाय आणि करिअरमध्ये चांगल्या ऑफर्स मिळू शकतात. मालमत्ता खरेदी किंवा विक्री करू शकता. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊन उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळू शकतो. राजकारणातील लोकांना काही पद मिळू शकते. या काळात कोर्टाचा निर्णय तुमच्या बाजूने येऊ शकतो. त्याशिवाय शेअर बाजार, सट्टेबाजी आणि लॉटरीमध्ये बंपर लाभ मिळण्याची शक्यता आहे.

कुंभ राशी  (Aquarius)

दोन राजयोगाची निर्मिती कुंभ राशीच्या लोकांसाठी अतिशय भाग्यशाली ठरु शकते. करिअरमध्ये तुम्ही उंच शिखर गाठू शकता. नोकरी आणि व्यवसायात तुमची प्रगती होऊ शकते. व्यावसायिकांना जबरदस्त फायदा होण्याची शक्यता आहे. नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत त्यांना उत्कृष्ट संधी मिळू शकतात. तुमचे अडकलेले पैसे परत मिळू शकतात. अविवाहित लोकांसाठी देखील हा चांगला काळ ठरु शकतो. या काळात तुम्हाला तुमचा इच्छित जोडीदार मिळू शकेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहण्याची शक्यता आहे.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Story img Loader