Uddhav Thackeray Acche Din By Astrology: बहुप्रतिक्षित असलेल्या आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल १० जानेवारी रोजी लागला. शिंदे व ठाकरे दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र ठरवलं गेलं असलं तरी निकालातील काही मुद्दे हे ठाकरे गटासाठी काहीसे धक्कादायकच ठरले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी २०१८ सालची शिवसेनेची घटनादुरुस्ती अवैध असल्याचे म्हणत सांगितले की, उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख म्हणून वैध ठरले नाहीत परिणामी त्यांनी केलेली कारवाई वैध ठरवता येणार नाही. याच आधारे शिंदे गट खरी शिवसेना आहे असे मोठे विधान विधानसभेत करण्यात आले.
ठाकरे गटाच्या नोटीसप्रमाणे शिंदे गटाचे सदस्य संपर्काच्या बाहेर गेल्याचं सादर पुराव्यांवरून सिद्ध होत नाही. शिवाय भरत गोगावले यांची प्रतोदपदी नियुक्ती वैध ठरवताना नार्वेकरांनी सुनील प्रभूंचं प्रतोदपद अवैध ठरवलं होतं.सुनील प्रभूंना पक्षासाठी कोणतीही बैठक बोलावण्याचा अधिकार नव्हता त्यामुळे शिंदे गटाच्या सदस्यांवर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी नार्वेकरांनी फेटाळली आहे. कालच्या निकालांनंतर ठाकरे गटाकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. काही ठिकाणी तर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुद्धा पुकारले आहे. या एकूण स्थितीत नेमका कधी व कसा सुधार होऊ शकतो याविषयी प्रसिद्ध ज्योतिषतज्ज्ञ उल्हास गुप्ते यांनी विशेष भविष्यवाणी केली आहे.
उल्हास गुप्ते यांनी सांगितल्याप्रमाणे ठाकरे यांच्या पत्रिकेतील द्वादशेश एकादशात रवि आहे. मागील कितीतरी दिवसांपासून त्यांच्या जवळची माणसे वाटेल तसे बोलून त्यांना अधिक संकटात टाकत आहेत. त्यांच्या भिडस्थ स्वभावामुळे ते स्पष्ट बोलू शकत नाहीत. त्यांच्या नवमान भाग्यात असलेला अष्टमेश मंगळ हा हिनबली वृषभ राशीत आहे. त्यामुळे हृदयाविषयी आजार तर षष्टात केतू व षष्टेश चतुर्थात वक्री शनी त्यांना मणक्यांचा आजार दाखवतो. पण या सर्वांवर मात करून आपलं शारीरिक- मानसिक दु:ख बाजूला सारून ते हसतमुखाने हात जोडून जनतेसमोर येतात. खरं तर ही ताकद हे बळ चतुर्थातील स्वराशीचा गुरु त्यांना देत आहे. शून्यातून उभे राहून पुढे जाण्याची ताकद हे षष्टातील शनि केतू देतील तर व्ययातील चंद्र राहू मानसिक त्रासही देतील.
हे ही वाचा<< “उद्याची शिवसेना निर्माण होईल पण उद्धव ठाकरेंची कुंडली दोन वर्ष…” ज्योतिषतज्ज्ञ उल्हास गुप्तेंची मोठी भविष्यवाणी
उद्धव ठाकरे यांचे अच्छे दिन कधी?
कृष्णपक्षातील षष्ठी ते शुक्ल पक्षातील दशमीपर्यंत चंद्रबळ क्षीण असते, तसेच हा चंद्र सिंहराशीत व्यय स्थानात बसला आहे. त्याबरोबर राहू व प्लुटो युती करत आहेत. एकूण ग्रहांची ही स्थिती मानसिक त्रासात भर घालणारी आहे. पण चतुर्थातील स्वगृहीच्या गुरूचे पाठबळ खूपसा दिलासा देईल. त्यातून परिश्रम, मेहनत यातून यशाचा मार्ग दिसू लागेल. विशेष म्हणजे गुरू महादशेत भाग्यातील मंगळाची महादशा खूपशी मानसिक स्थिरता देईल. २५ जून २०२५ ते १ जून २०२६ या काळात नवे विचार, नवीन प्रेरणा, नवीन दिशा उद्धव ठाकरे यांना सापडेल आणि त्यातून संघटनेला वेगळे बळ नक्कीच प्राप्त होईल.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)