-जयंती अलूरकर

काळ तर मोठा कठीण आला, पण…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टॅरो मध्ये विविध कार्डस् असताता, जी जी कार्डस् समोर येतात, त्यानुसार त्या व्यक्तीचे भविष्य सांगितले जाते. २०२३ या नव्या वर्षामध्ये महाराष्ट्राचे राजकीय अंतरंग जाणून घेण्याचा हा प्रयत्न आहे. यामध्ये विविध महत्वाच्या राजकीय नेत्यांचे भविष्य समजून घेणार आहोत.

शिवसेना, धनुष्यबाण आणि उद्धव ठाकरेंसमोर कष्टाचे डोंगर..

गेल्या वर्षी झालेल्या राजकीय उलथापालथीनंतर संपूर्ण महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष महाराष्ट्राच्या राजकारणाकडे लागून राहिले आहे. सुरुवातीस एकनाथ शिंदे यांनी भारतीय जनता पार्टीच्या सहकार्याने उद्धव ठाकरे यांना जोरदार धक्का दिला आणि भाजपाच्या मदतीने सत्ता स्थापन केली. एवढ्यावरच न थांबता त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवरही स्वतःचा हक्क सांगितला. निवडणूक चिन्हावरही हक्क सांगून उद्धव ठाकरे यांना जेरीस आणले. आता तर दोनच दिवसांपूर्वी निवडणूक आयोगानेही शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह दोन्ही एकनाथ शिंदे यांना बहाल केल्याने उद्धव ठाकरे यांच्यासमोर आणि अडचणींचे डोंगरच उभे असणार असे संकेत दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयात आमदार अपात्रतेबाबत सुनावणी सुरू आहे. आता एका बाजूला न्यायालयात आणि दुसरीकडे रस्त्यावरही अशा दोन्ही पातळ्यांवर ठाकरे यांना संघर्ष करावा लागणार आहे.

सद्यस्थितीत टॅरोरुपी आरसा असे सांगतो की, भूतकाळात झालेल्या घटनांचा वर्तमानावर परिणाम होतो. आणि त्या त्या गोष्टी योग्य वेळेवर सावरल्या गेल्या नाहीत तर भविष्यावर सुद्धा त्यांचे गंभीर परिणाम झाल्याशिवाय राहत नाहीत. २०२३ ते २०२५ ही वर्षे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी खूपच त्रासदायक आणि आर्थिक नुकसानीची सुद्धा आहेत. याकाळात एका मागून एक संकटे त्यांच्या दिशेने येताना दिसत आहेत. हीच वेळ आहे त्यांनी स्वतःला सावरायची. “माझे कुटुंब माझी जबाबदारी” ही उक्ती लक्षात ठेऊन सर्व धुरा त्यांनी स्वतःच्याच हातात ठेवावी. हितशत्रू बरोबर ओळखून त्यांच्यापासून सावध रहावे. कोणतीही गोष्ट अधिक ताणल्यास त्यांचे आर्थिक आणि मानसिक नुकसान संभवते.

ठाकरेंचे व्हील ऑफ फॉर्च्युन..

या काळात त्यांच्या वर वाढत जाणारा ताण हा राजकीय कमी आणि अपेक्षांचा अधिक असेल. यांच्या त्यांच्या शरीरावर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे त्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे. “Wheel of Fortune (Reverse)” हे टॅरोकार्ड उद्धव ठाकरे यांना असे सूचवू पाहात आहे की, काही गेले अथवा संपले म्हणून जगरहाटी थांबत नाही. हे कालचक्र आहे. गोष्टींकडे ज्याप्रमाणे मनुष्य पाहतो त्याचप्रमाणे त्या, त्याच्या आयुष्यात घडत असतात. त्यामुळे शून्यातून जग निर्माण करण्यासाठी कंबर कसायला हवी आहे. दोषारोप करत बसण्यात फक्त वेळ वाया जाईल, हाती काहीही लागणार नाही. त्यामुळे कंबर कसून कामाला लागा.

हे ही वाचा<< २१ एप्रिलपासून मोदींच्या कुंडलीत कष्टी दिन! ज्योतिषतज्ज्ञ म्हणतात “२०२४ ला सत्ता टिकवण्यासाठी मुस्लिमच..”

उद्धव ठाकरेंचे डेव्हील कार्ड

ठाकरे यांना आलेले “डेव्हिल” कार्ड हे दाखवत आहे की काही वाईट प्रवृत्ती डोके वर काढण्याचा प्रयत्न करतील, मात्र त्यांनी स्वतःची सद्सद्विवेकबुद्धी शाबूत ठेवावी. मी-मी म्हणणारे हितशत्रू संधी साधून निसटून जातील आणि त्यातून ठाकरे यांनी सैरभैर व्हावे, अशी हितशत्रूंची अपेक्षा असेल त्यामुळे हा धोका ठाकरे यांनी लक्षात ठेवावा. त्यांची पुढची वाटचाल संयमित व सहज असावी हीच अपेक्षा.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray astrology lost shivsena and party sign to eknath shinde new big tension as per tarot card reader svs
First published on: 20-02-2023 at 14:26 IST