Uddhav Thackeray Kundali Predictions For Vidhan Sabha Elections: प्रत्येक निवडणूक ही नवा चेहरा घेऊन येत असते. नवीन उमेदवार, नव्या पक्षाच्या आघाड्या, आश्वासने, जोरदार भाषणे यांचा चिंब पाऊस पडत असतो. पण जशा निवडणुका जवळ येत जातात तसे मतदार अधिक सुजाण होत जातात. पूर्वी काँग्रेसच्या काळात निवडणुकांमध्ये खेड्यातील माणसं गाय वासरू चिन्ह लक्षात ठेवून उमेदवारावर शिक्का मारत असत. आता काळाप्रमाणे माणसं बदलली आहेत. आता ग्रामपंचायतीच्या निवडणुकांपासून लोकांना खरे राजकारण समजू लागले आहे. आमिषे, आश्वासनांना ते बळी पडत नाहीत, त्यांना त्यांच्या हक्काच्या मागण्या पूर्ण करणारी माणसे हवी असतात आणि त्यांना शोधून, ओळखूनच ते मतदान करतात. याचा प्रत्यय कमी अधिक प्रमाणात का होईना लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालात सुद्धा दिसून आलाच.

राजकारणात संयमाने व शांतपणे घेतलेले निर्णय योग्य ठरतात हे शिवसेनेत फूट पाडणाऱ्यांना उद्धव ठाकरे यांनी दाखवून दिले असेही म्हणता येईल. उद्धव ठाकरे यांच्या स्वभाव वैशिष्ट्याचा अभ्यास ज्योतिषीय बाजूने करताना एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे, बाळासाहेब ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्या कुंडलीत काही समान दुवे आहेत. हे दुवेच उद्धव ठाकरेंना योग्य निर्णय घेण्यात कसे मदत करतात, तसेच येत्या विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांना या निर्णय क्षमतेची कशी मदत होऊ शकते हे आपण आता जाणून घेऊया.

What Uddhav Thackeray Said About Raj Thackeray ?
Uddhav Thackeray : “राज ठाकरेंशी युती करणं शक्यच नाही, महाराष्ट्र द्रोही..”, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
sillod assembly constituency uddhav thackeray campaign for suresh bankar maharashtra assembly elections 2024
ठाकरेंची सत्तारांविरोधात भाजपला साद मतभेद असतील तर बोलू; पण आधी सिल्लोडमध्ये पराभव करण्याचे आवाहन
Astrological predictions 2025 for Uddhav Thackeray in Marathi
Uddhav Thackeray 2025 Astrological Predictions : ‘२०२५ पर्यंत सुवर्णकाळ…’ उद्धव ठाकरेंसाठी ज्योतिषांची मोठी भविष्यवाणी; म्हणाले, ‘शिवसेनेचे राज्य…’
Uddhav Thackeray Speech in Ausa Latur
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची खोचक शब्दांत टीका, “महायुतीला मत म्हणजे गुजरातला मत, कारण..”
What Raj Thackeray Said?
Raj Thackeray : राज ठाकरेंची बोचरी टीका, “उद्धव ठाकरेंकडून बाण गेला आणि फक्त खान राहिले आहेत, कारण..”
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : “…तर मविआचे कार्यकर्ते फडणवीस, अजित पवारांच्या बॅगा तपासतील”, निवडणूक अधिकाऱ्यांनी बॅगेची तपासणी केल्यानंतर उद्धव ठाकरेंचा इशारा

उद्धव ठाकरे शिवसेनेचे उत्तराधिकारी का झाले?

तर, उद्धव ठाकरे व बाळासाहेब ठाकरे यांच्या कुंडलीत एक दुवा आहे तो म्हणजे त्या दोघांच्याही कुंडलीतील प्रथमस्थानी लग्न राशी कन्या आहे तर उत्तरा फाल्गुनी हे नक्षत्र त्यांच्या कुंडलीत आहे. उद्धव ठाकरे हेच शिवसेनेचे उत्तराधिकारी का झाले याचे चोख उत्तर या योगातून मिळते. उत्तरा फाल्गुनी नक्षत्रावर ज्यांचा जन्म होतो, अशांना राजयोग व लोकप्रसिद्धी लाभते. सध्या देशात राजकीय स्थित्यंतरासाठी महाराष्ट्र हा केंद्रबिंदू मानला गेला आहे त्यामुळे इंडिया आघाडीतही उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व खूप महत्त्वाचे ठरणार आहे.

लोकविजयाची विधानसभा!

नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे ११ पैकी महायुतीचे ९ उमेदवार तर महाआघाडीचे दोन उमेदवार निवडून आले. या सर्व घडामोडीत सहा ते सात उमेदवार फुटल्याने काँग्रेसची नाचक्की झाली. हे सारे प्रसंग, या घडामोडी लोकांनी पाहिलेल्या आहेत व त्यांच्या त्या मनात बसलेल्या आहेत. लोकशाहीचा व नेत्यांचा प्रवास आता कुठल्या थरापर्यंत जातोय हे मतदार पाहत बसणार नाहीत उलट येणारी विधानसभा निवडणूक ही लोकविजयाची ठरणार आहे. यामध्ये उद्धव ठाकरेंचा सहभाग मोठा असेल.

उद्धव ठाकरेंना पक्षातील ‘या’ मंडळींपासून सावध राहावेच लागेल!

उद्धव ठाकरेंच्या भाग्य स्थानात गोचराने येणारा गुरु हा सप्तम स्थानी येणाऱ्या नेपच्यूनशी त्रिएकादश योग साधत आहे. तसेच मूळ कुंडलीतही नेपच्यून गुरुशी त्रिएकादश योग जुळत आहे. हा खऱ्या अर्थाने तपस्विक ज्ञान योग असून यातून श्रेष्ठ प्रतीची फलप्राप्ती होऊ शकते. हा योग ज्यांच्या कुंडलीत असतो, ती माणसे लोकांच्या मनाचा ठाव घेऊन महान कार्य करतात व परिणामी यश संपादित करत असतात. राजकारणात नवीन बदल घडवून आणण्याचे बळ त्यांच्या गाठीशी असते. सध्या उद्धव ठाकरे यांच्या कुंडलीत रवी हर्षल योग सुद्धा आहे परिणामी त्यांना पक्षातीलच बरोबरी करू शकणाऱ्या लोकांपासून सावध राहावे लागेल. काही लोक वायफळ बडबड करून अडचणीत आणू शकतात, त्यांच्यापासून सावध राहणे सुद्धा आवश्यक असेल!

हे ही वाचा<< Rain Predictions: जुलै महिन्यात ‘या’ तारखांना वेडावाकडा पाऊस बरसणार; नक्षत्रानुसार ३१ जुलैपर्यंत ‘असं’ असेल हवामान

शिवसेनेचे वर्चस्व वाढण्यासाठी ‘हा’ महिना उजाडावा लागणार!

१४ डिसेंबर २०२४ पर्यंत आपल्या कुंडलीत गुरुची महादशा चालू राहील तर १८ ऑगस्ट २०२५ पर्यंत चंद्राची अंतर्दशा कायम असेल. या दरम्यान प्रकृतीची काळजी घ्यावी. २०२५ च्या नोव्हेंबरपासून यशाकडे वाटचाल सुरु होईल. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे वर्चस्व वाढेल. अधिक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या वाढतील. एकूणच प्रगतीदायक कालावधीचा लाभ घेता येईल.