Uddhav Thackeray Kundli Predictions: उद्धव ठाकरे यांच्या वाट्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद आले पण त्याबरोबरच आव्हानांचा डोंगरसुद्धा त्यांच्यासमोर उभा ठाकला गेला. करोनाने देशभरात हैदोस घातलेला असताना उद्धव ठाकरेंनासुद्धा आरोग्य समस्या भेडसावू लागल्या. या साऱ्यावर मात करेपर्यंत एकनाथ शिंदेंच्या बंडाला साथ देत ४० हून अधिक आमदारांनी शिवसेनेची कास सोडली. या सगळ्या उलाढालींच्या कारणांचा विचार करता याचे काही पुरावे उद्धव ठाकरे यांच्या कुंडलीत दिसून येतात. ग्रहांनी सोडलेली साथ आणि तिथून सुरु झालेल्या यश- अपयशाच्या घटनांच्या सत्रात आता उद्धव ठाकरे यांच्या पत्रिकेत भविष्यात काय लिहिलेले आहे यावर एक नजर टाकूया..

उद्धव ठाकरेंना स्वबळावर निर्णय घेता आले तर..

शिवसेनेची स्थापना १९ जुलै १९६६ ला झाली. शिवसेना पक्षाच्या कुंडलीत कुटुंब स्थानात राहू मंगल असल्याने संघटना चालवताना येणाऱ्या अडचणी, संघटना मधूनच सोडून जाणारी मंडळी हे प्रकार कमी- जास्त प्रमाणात घडतच राहू शकतात. संघटनेतील प्रत्येकाला त्याच्या कुवतीनुसार कामे दिल्यासच संघटना स्थिर राहू शकते. दया- भावुकता पक्ष चालवताना दूरच ठेवणे हिताचे ठरेल. प्रामाणिक सेनाप्रेमी सहकाऱ्यांकडून विश्वासाची कामे करून घ्यावीत. सध्या बुधाची महादशा सुरु आहे. बुध स्वगृही पंचमात असल्याने कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेताना स्वबळावर घेणे आवश्यक ठरेल. बुध महादशेमध्ये केतूची अंतर्दशा लोकसभेच्या निवडणुकीत अपेक्षित यश मिळवून देईल. यापुढे २७ सप्टेंबर २०२७ पर्यंत शिवसेना महाराष्ट्राला आपल्या अस्तित्वाची प्रकर्षाने जाणीव करून देऊ शकते. शिवसेनेची लोकशक्ती वाढू शकते.

uddhav Thackeray Devendra fadnavis
“पुढील मकर संक्रांतीपर्यंत ठाकरे-फडणवीस एकत्र”, आमदार रवी राणांचा दावा
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Image Of MVA Leaders
MVA : “महाविकास आघाडी उद्ध्वस्त होतेय, जनतेने त्यांना हाकलून दिले”, ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा; अजित पवार गटाचा टोला
Supriya Sule
Supriya Sule : महापालिका निवडणुकीबाबतच्या ठाकरे गटाच्या भूमिकेवर सुप्रिया सुळेंचं रोखठोक मत; म्हणाल्या, “या निवडणुका…”
Vijay Wadettiwar On Thackeray group
Vijay Wadettiwar : “आम्ही उद्धव ठाकरेंना विनंती करू, अन्यथा…”, ठाकरे गटाच्या स्वबळाच्या घोषणेवर विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान
Uddhav thackeray and Prakash Ambedkar
ठाकरेंच्या शिवसेनेने स्वबळाचा नारा दिल्यानंतर प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप; म्हणाले, “आदित्य ठाकरेंच्या…”
What Uddhav Thackeray Said?
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचं वक्तव्य, “ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले नाहीत ते सगळेजण…”
What Aditya Thackeray Said?
Aditya Thackeray : “…तर आम्हीही देवेंद्र फडणवीसांचं कौतुक करु”, मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर असं का म्हणाले आदित्य ठाकरे?

हे ही वाचा<< “उद्धव ठाकरेंचा घात करू शकतात ‘ही’ माणसं, जून २०२४ मध्ये..”, ज्योतिषतज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी, लवकरच..

शिवसेनेला सोडलं, त्यांचं…

उद्धव ठाकरे यांच्या कुंडलीत लग्नेश व दशमात बुध वायू राशीचा असल्यामुळे राजकारण हा बुध बौद्धीक बळ वाढवेल. चतुर्थात धनु राशीतील शनि- गुरु दशम स्थानाकडे सातव्या दृष्टीने पाहत आहे. संधी मिळताच विरोधकांना कसे हरवायचे याचे कसब आपल्या गाठीशी असेल.

उद्धव ठाकरेंसाठी १ मे २०२४ तारीख महत्त्वाची कारण..

उद्धव ठाकरे यांच्या कुंडलीच्या षष्ठातील केतू शिवसेना सोडून जाणाऱ्यांना धडा शिकवतो. जे जे शिवसेनेला फसवून गेले आहेत त्यांना राजकीय संकटातून जावे लागले आहे. रवी मंगळ त्रिएकादश योगातून उद्धव ठाकरे यांना मात्र राजकीय यश प्राप्त होईल. इतकेच नव्हे तर गोचरीचा षष्ठातील शनी व जोडीने येणारा मंगळ अधिक बलवान होऊन विरोधकांना पराजयाची वाट दाखवून देईल. तसेच १ मे २०२४ ला नवमात येणारा गुरु निवडणुकीत घडणाऱ्या यशाच्या घटनांचा साक्षीदार असेल. विरोधकांना आपल्या ताकदीची जाणीव उद्धव ठाकरे करून देतील. जे गेले त्यांना जाऊदे व जे राहिले ते शेवटपर्यंत आपले अशा सहृदयतेने उद्धव ठाकरे यांना आपल्या संघटनेचे बळ वाढवणे आवश्यक ठरेल.

उल्हास गुप्ते

Story img Loader