Daily Horoscope 26 November 2024 in Marathi : आज २६ नोव्हेंबर रोजी कार्तिक मासातील कृष्ण पक्षातील एकादशी आहे. मंगळवारी एकादशी तिथी रात्री ३ वाजून ४८ मिनिटांपर्यंत राहील. तसेच २ वाजून १४ मिनिटांपर्यंत प्रीती योग जुळून येईल. तर मंगळवारी पहाटे साडेचार वाजेपर्यंत हस्त नक्षत्र जागृत असणार आहे. आज राहू काळ दुपारी ३ वाजता सुरु होईल ते ४ वाजून ३० मिनिटांपर्यंत राहील.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
याशिवाय मंगळवारी २६ नोव्हेंबर रोजी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी आहे, तिला उत्पत्ती एकादशी म्हणतात. या दिवशी भगवान विष्णूची उपासना केल्याने विशेष फल प्राप्त होते, सर्व त्रास दूर होतात; असे मानले जाते. तर आज १२ पैकी कोणत्या राशीवर असणार विष्णूची कृपा? तुम्हाला मेहनतीचं फळ मिळणार का हे आपण जाणून घेऊया…
२६ नोव्हेंबर पंचांग व राशिभविष्य :
मेष:- छोटे प्रवास घडतील. एखादी विशेष व्यवस्था करावी लागेल. समजुतीत बदल होण्याची शक्यता. मनात आकर्षण भावना वाढू शकते. दिवस मनाजोगा जाईल.
वृषभ:- अचानक कौटुंबिक खर्च वाढू शकतो. घरात आनंदवार्ता मिळेल. दिवस चांगला जाईल. नवीन करार पूर्णत्वास जाईल. कौटुंबिक गोष्टीत दिवस जाईल.
मिथुन:- महत्त्वाच्या गोष्टीत जोडीदाराचा सल्ला घ्यावा. निकाल तुमच्या बाजूचा असेल. अचानक धावपळ करावी लागू शकते. घरात शिस्त बाळगाल. नातेवाईक भेटायला येतील.
कर्क:- तुमचे कौशल्य पणाला लावा. नोकरीत उत्साही वातावरण राहील. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. व्यावसायिक प्रगती करता येईल. प्रलंबित कामे मार्गी लावाल.
सिंह:- आपल्याला आवडणार्या गोष्टीत अधिक लक्ष घालाल. आत्मविश्वास वाढीस लागेल. वैवाहिक जीवन सुखमय असेल. मधुर वाणीने सर्वांची मने जिंकून घ्याल. मानसिक शांतता लाभेल.
कन्या:- आपल्यातील कलागुणांना वाव द्यावा. मात्र कौतुकाची फार अपेक्षा करू नका. समोरील जबाबदारी उत्तमरित्या पेलाल. एखाद्याकडून मदतीची अपेक्षा बाळगाल. नसत्या काळज्या करू नका.
तूळ:- आपले स्वत्व राखून बोलाल. बोलण्यात अधिकार वाणी ठेवाल. सामाजिक प्रतिष्ठा जपाल. एखादी भेटवस्तू मिळेल. मित्रांच्या मदतीने एखादी योजना आखाल.
वृश्चिक:- काही कामे उगाचच अडकून पडल्यासारखी वाटू शकतात. जुनी उधारी वसूल होईल. मन प्रसन्न राहील. दिवसभरात काहींना काही लाभ मिळेल. तज्ञ व्यक्तीचा सल्ला मोलाचा ठरेल.
धनू:- स्वत:वरील विश्वास कायम ठेवावा. व्यावहारिक फसणूकीपासून सावध रहा. काही समस्यांचे निराकरण होऊ शकते. कायदेशीर बाबीत सकारात्मकता दिसेल. कौतुकास पात्र व्हाल.
मकर:- अचानक धनलाभ संभवतो. आपल्या तत्वांना मुराद घालू नका. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. जोडीदाराशी क्षुल्लक गोष्टीवरून मतभेद होऊ शकतो. दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल.
कुंभ:- वडीलधार्या व्यक्तींना नाराज करू नका. तुमचे संपर्क क्षेत्र वाढेल. जोडीदार तुमच्यावर खुश असेल. मित्रांचे भरपूर सहकार्य लाभेल. मानसिक प्रसन्नता लाभेल.
मीन:- जुनी कामे मार्गी लावाल. जोडीदाराशी संघर्ष टाळावा. विवाह विषयक बोलणी पुढे सरकतील. नोकरदारांना दिवस चांगला जाईल. सासुरवाडीची मदत मिळेल.
(ज्योतिषी विद्याधर करंदीकर )