फेब्रुवारी महिना म्हटलं की तरुणाईला आठवतो ‘व्हॅलेंटाईन डे’ कारण या दिवशी अनेक तरुण-तरुणी आपल्या मनातलं प्रेम व्यक्त करत असतात. त्यामुळे प्रेमाच्या दृष्टीने फेब्रुवारी महिन्याचं विशेष महत्त्व आहे. सोप्या शब्दात सांगायचे तर फेब्रुवारी महिना म्हणजे एकमेकांवर प्रेम व्यक्त करण्याचा महिना असतो. परंतु ज्योतिषशास्त्रानुसार फेब्रुवारी महिन्यामध्ये ग्रहांचे गोचर काही राशींवर शुभ तर काहींवर अशुभ प्रभाव टाकते.
ज्योतिषशास्त्रानुसार, फेब्रुवारी महिन्यात काही राशीच्या लोकांना प्रेमाचा प्रस्ताव येऊ शकतो, तर काही लोकांचे नवीन जोडीदारासोबत प्रेमसंबंध बनू शकतात. शिवाय काहींचे प्रेमसंबंध जुळतील तर काहींचे तुटूही शकतात. त्यामुळे हा महिना कोणत्या राशीतील लोकांच्या जीवनात प्रेमाचे नाते घेऊन येईल आणि कोणत्या लोकांचा जोडीदारासोबतच्या नात्यातील जिव्हाळा वाढेल ते जाणून घेऊया.
हेही वाचा- फेब्रुवारीत ‘या’ व्यक्तींना प्रचंड धनलाभाची संधी; सोनल चितळेंकडून जाणून घ्या १२ राशींचं मासिक भविष्य
मेष : या राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी महिना प्रेमाने भरलेला राहील. त्यांना त्यांच्या जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल. या राशीतील प्रेमींना आनंदाचे क्षण अनुभवायला मिळण्याची शक्यता आहे.
वृषभ : या राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी महिना प्रेमाचा बहारच घेऊन येतो. त्यामुळे या राशीतील लोकांकडून प्रेम व्यक्त होण्याची शक्यता आहे. शिवाय प्रेमात असलेल्या तरुणांना प्रेयसीकडून लग्नाचा प्रस्तावही येऊ शकतो.
मिथुन: या राशीच्या लोकांना कोणाला प्रपोज करायचे असेल तर त्यांच्यासाठी हा महिना खूप चांगला ठरु शकतो.
कन्या : कन्या राशीतील लोक फेब्रुवारी महिन्यात कुठेतरी फिरायला जाण्याची योजना करू शकतात. प्रपोज करण्यासाठी फेब्रुवारी महिन्याचा पहिला आठवडा या लोकांसाठी उत्तम आहे.
वृश्चिक : या राशीच्या लोकांसाठी हा महिना प्रेमाच्या दृष्टीने उत्तम राहील. प्रपोज करण्यासाठी मदत होईल आणि जोडीदारासोबतचे प्रेमसंबंध कायम राहतील.
हेही वाचा- २० वर्षांनंतर तयार होणार ४ ‘धन राजयोग’; ‘या’ राशींचे भाग्य चमकणार, मिळू शकतो अपार पैसा
कुंभ : या राशीतील लोकांना फेब्रुवारी महिन्यात आपल्या प्रेयसीसोबत प्रवासाचा आनंद घेता येईल. तसंच फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात या राशीतील लोक आपल्या आवडत्या व्यक्तीजवळ प्रेम व्यक्त करू शकतात.
मकर : या राशीच्या लोकांना फेब्रुवारी महिन्यात रोमान्सचा आनंद घेता येईल. फेब्रुवारी महिन्यात प्रियकर आणि प्रेयसीच्या नात्यात गोडवा येण्याची शक्यता आहे.
कर्क: फेब्रुवारी महिन्यात कर्क राशीच्या लोकांना जोडीदाराकडून खूप प्रेम मिळू शकते.
धनु: फेब्रुवारीचा पहिला आठवडा या राशीच्या लोकांच्या प्रेमसंबंधामध्ये चढ-उतार आणू शकतो. तर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात प्रेमसंबंध सुधारु शकतात.
तूळ : फेब्रुवारी महिना पार्टनरसाठी चांगला राहील. तुम्हाला जर कोणाला प्रपोज करायचे असेल तर या महिन्यात प्रपोज करू शकता. तुम्हाला प्रियकराची साथ मिळू शकते.
सिंह: हे लोक फेब्रुवारी महिन्यात सहलीला जाण्याची शक्यता आहे. तसंच नवीन प्रेमसंबंध निर्माण होऊ शकतात.
मीन: या राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी महिना प्रेमाच्या बाबतीत स्फोटक राहील. प्रियकर-प्रेयसी एकमेकांना प्रपोज करू शकतात.
(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)