हिंदू धर्मात एकादशी तिथीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी लोक उपवास करतात आणि भगवान विष्णूची पूजा करतात. प्रत्येक महिन्यात दोन एकादशी असून एकादशीचे व्रत मोक्ष देणारे मानले जाते. चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या तिथीला येणाऱ्या एकादशीला वरुथिनी एकादशी म्हणतात. यावेळी वरूथिनी एकादशी २६ एप्रिल रोजी येत आहे. शास्त्रानुसार भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठिराला वरुथिनी एकादशी व्रताचे महत्त्व सांगितले होते. वरुथिनी एकादशीला त्रिपुष्कर योग तयार होत आहे. या एकादशीचे महत्त्व आणि पूजा मुहूर्त जाणून घेऊया…
वरुथिनी एकादशी शुभ मुहूर्त
वैदिक पंचांगानुसार चैत्र कृष्ण एकादशी तिथी २६ एप्रिल रोजी रात्री उशिरा १ वाजून ३६ मिनिटांनी सुरू होत आहे.शुभ मुहूर्त मंगळवार, २६ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजून ४६ मिनिटांपर्यंत राहील. त्यामुळे उपवास, उपासना आदींमध्ये सूर्योदयाच्या आधारे तिथी काढली जाते. त्यामुळे २६ एप्रिल ही चैत्र कृष्ण एकादशी तिथी असेल. अशा स्थितीत वरुथिनी एकादशीचे व्रत या दिवशीच ठेवले जाणार आहे. या दिवसाचा शुभ मुहूर्त ११ वाजून ५२ मिनिटांपासून सुरू होईल आणि रात्री १२ वाजून ४४ मिनिटांपर्यंत राहील.
त्रिपुष्कर योग
या दिवशी त्रिपुष्कर योग तयार होत आहे. या योगाला ज्योतिषशास्त्रात विशेष महत्त्व आहे. ज्योतिष शास्त्रानुसार या योगात केलेले दान आणि पुण्य अनेक पटींनी फळ देते. वरुथिनी एकादशी व्रताच्या दिवशी, त्रिपुष्कर योग २६ एप्रिल रोजी सकाळी १२ वाजून ४६ मिनिटांपासून सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी २७ एप्रिल रोजी पहाटे ५ वाजून ४३ मिनिटांपर्यंत असेल.
वरुथिनी एकादशीचे महत्त्व
पुराणानुसार हे व्रत केल्याने मनुष्याला सर्व संकटांपासून मुक्ती मिळते. सूर्यग्रहणाच्या वेळी दान केल्याने जे फळ मिळते, तेच फळ हे व्रत केल्याने मिळते. या व्रताचे पालन केल्याने मनुष्याला इहलोक आणि परलोक दोन्ही सुख प्राप्त होते आणि शेवटी स्वर्गात जातो, अशी मान्यता आहे. हे व्रत केल्याने मनुष्याला हत्ती दान आणि भूमी दान करण्यापेक्षा अधिक शुभ फल प्राप्त होते. वरुथिनी हा शब्द संस्कृत भाषेतील ‘वरुथिन्’ मधून आला आहे, ज्याचा अर्थ आहे- संरक्षक किंवा कवच हा आहे. या एकादशीचे व्रत केल्याने भगवान विष्णू भक्तांचे प्रत्येक संकटातून रक्षण करतात आणि त्यांना सुख-समृद्धीचे वरदान देतात.
Astrology 2022: मेष राशीत बुधादित्य योग, ‘या’ राशींसाठी शुभ काळ
या गोष्टींची विशेष काळजी घ्या
वरुथिनी एकादशीचे व्रत करणाऱ्या भक्तांनी या दिवशी पितळेच्या भांड्यातील अन्न खाऊ नये. यासोबतच मांसाहार, मसूर, हरभरा आणि शेंगाच्या भाज्या आणि मध यांचे सेवन करू नका. त्याचबरोबर उपवासाच्या दिवशी जुगार खेळू नये. रात्री झोपू नये, तर सर्व वेळ शास्त्र, नामजप, भजन-कीर्तन इत्यादींमध्ये वापरला पाहिजे. या दिवशी भक्तांना सुपारी खाण्याची आणि दातून करण्याची परवानगी नाही.