Vasant Panchami 2025 : ज्योतिषशास्रामध्ये वसंत पंचमीपूर्वी पाच ग्रहांच्या चालीमध्ये बदल होणार आहे ज्याचा प्रभाव राशी चक्रातील सर्व राशींवर दिसून येईल. २८ जानेवारी रोजी शुक्र ग्रह मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहे. गुरू ३० जानेवारी रोजी बुध राशीमध्ये प्रवेश करणार आहे. ३१ जानेवारी रोजी सूर्य आणि गुरू १२० डिग्रीवर विराजमान होऊन नवपंचम योग निर्माण करणार आहे. त्यानंतर वसंत पंचमीच्या एक दिवसापूर्वी १ फेब्रुवारी २०२५ रोजी शुक्र ग्रह स्वामी ग्रह शनि असलेल्या उत्तराभाद्रपद नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहे.
या पाच ग्रहांमुळे काही राशींचे नशीब चमकू शकते. तसेच या राशींच्या करिअर आणि व्यवसायात प्रगतीचे योग जुळून येईल. जाणून घेऊ या त्या राशी कोणत्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

धनु राशी (Dhanu Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी ५ ग्रहांची चालीमध्ये बदल लाभदायक ठरू शकते. या दरम्यान या लोकांना प्रॉपर्टी आणि वाहन खरेदी करण्याची इच्छा होईल. तसेच वित्तीय प्रकरणात सुधारणा आणि गुंतवणूक केल्याने लाभ मिळू शकतो. या लोकांवर शनिदेवाची कृपा दिसून येईल जे मेहनतीनुसार फळ प्रदान करतील. शनि देव मेहनतीचे फळ प्रदान करतील आणि जुने प्रोजेक्ट्सवर मार्गी लागतील. सूर्याच्या प्रभावामुळे प्रत्येक क्षेत्रात यश मिळेन. या लोकांचा आत्मविश्वास वाढेन या लोकांना समाजात मान सन्मान मिळेन.

मेष राशी (Aries Zodiac)

या लोकांसाठी ५ ग्रहांची चालीमध्ये बदल फायद्याचा ठरू शकतो. या दरम्यान या लोकांना अडकलेले धन परत मिळू शकते. तसेच नोकरी व्यवसाय करणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी यश मिळेल. नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. तसेच या वेळेत या लोकांची बुद्धीमत्ता वाढू शकते. करिअरमध्ये नवीन प्रगतीचे मार्ग उघडतील. शनिच्या स्थिती स्थिरता आणेल. मेहनतीचे फळ मिळेन. सूर्याच्या प्रभावामुळे नेतृत्व क्षमता सुधारेन. विवाहित लोकांचे जीवन अधिक शानदार होईल. या दरम्यान या लोकांची इच्छापूर्ती होईल. या लोकांची कार्यक्षमता वाढेन.

मीन राशी (Meen Zodiac)

पाच ग्रहांच्या चालीमध्ये बदल मीन राशीच्या लोकांसाठी अतिशय फायदेशीर ठरू शकतो. या लोकांचे धाडस वाढेल. हे लोक व्यवसायात प्रगती करतील. या दरम्यान या लोकांना प्रचंड धनलाभ मिळू शकतो. तसेच कामाच्या ठिकाणी या लोकांची प्रगती होऊ शकते. नवीन जबाबदारी यांना मिळू शकते

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)