Vasant Panchami 2025: माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला वसंत पंचमी साजरी केली जाते. भारतातील अनेक भागांत हा सण साजरा केला जातो. खरंतर, ज्याप्रमाणे दिवाळीतील लक्ष्मी पूजनाला धन-संपत्तीसाठी देवी लक्ष्मीची पूजा-आराधना केली जाते, त्याचप्रमाणे वसंत पंचमीला बुद्धी, ज्ञान, कला प्राप्त करण्यासाठी देवी सरस्वतीची पूजा-आराधना केली जाते. अनेक शाळा, महाविद्यालयांमध्येही हा सण साजरा केला जातो. असं म्हणतात, या दिवशी सरस्वती देवीची पूजा केल्याने व्यक्ती बुद्धिमान आणि एकाग्र होतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हिंदू पंचांगानुसार, माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला वसंत पंचमी साजरी केली जाते. यंदा वसंत पंचमी तिथी २ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजून १४ मिनिटांपासून सुरू होणार असून ती पहाटे ३ फेब्रुवारीला ६ वाजून ५२ मिनिटांपर्यंत असेल.

हा सण भारतासह पश्चिमोत्तर बांगलादेश आणि नेपाळमध्येही उत्साहात साजरा केला जातो. या दिवसापासून हिवाळा ऋतू संपतो आणि वर्षात सर्वात चांगला मानल्या जाणाऱ्या वसंत ऋतूची सुरुवात होते.

वसंत पंचमीचा शुभ मुहूर्त

वसंत पंचमीच्या दिवशी सरस्वती पूजन करण्यासाठी २ फेब्रुवारी सकाळी ७ वाजून ९ मिनिटांपासून ते दुपारी १२ वाजून ३५ मिनिटांपर्यंत शुभ मुहूर्त असेल.

वसंत पंचमीची कथा

वसंत पंचमीच्या दिवशी देवी सरस्वती ब्रह्म देवांच्या मुखातून प्रकट झाल्या, तेव्हापासून संपूर्ण सृष्टीला वाणी आणि ज्ञानाची प्राप्ती झाली.

वसंत पंचमीशी जोडलेल्या आणखी एका कथेनुसार, वसंत पंचमीची कथा महाकवी कालिदास यांच्याशी जोडलेली आहे. पौराणिक कथेनुसार, कालिदास यांची पत्नी त्यांना सोडून गेली त्यावेळी ते खूप दुःखी झाले आणि आत्महत्या करण्यासाठी नदीच्या किनाऱ्यावर पोहोचले. ते आत्महत्या करणार, त्या पूर्वी देवी सरस्वती त्यांच्यासमोर प्रकट झाल्या आणि त्यांना त्या नदीमध्ये स्नान करण्यास सांगितले. जेव्हा कालिदासांनी त्या नदीमध्ये स्नान केले तेव्हा अचानक त्यांचे आयुष्य बदलले आणि ते महाज्ञानी झाले. तेव्हापासून त्यांनी महाभारत आणि रामायणासारख्या अनेक काव्यांची रचना केली.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vasant panchami 25 which day will vasant panchami be celebrated saraswati pujan date tithi and shubh muhurat sap