Burning Candle Vastu: आपल्यापैकी बरेच लोक वास्तुशास्त्रावर विश्वास ठेवतात. बरेच लोकं घराच्या बांधकामापासून ते त्याच्या सजावटीपर्यंत सगळं काम वास्तुशास्त्रानुसार करतात. असे मानले जाते की, जर घरातील वास्तुशास्त्र चांगलं असेल. तर त्याचा चांगला परिणाम घरातील व्यक्ती आणि त्यांच्या आयुष्यावर होतो. वास्तुशास्त्रात वस्तुंशी संबंधीत असे अनेक नियम आहेत आणि त्याचा माणसाचे सुख आणि समृद्धीशी थेट संबंध असल्याचे मानले जाते.

आपल्या जीवनातील अनेक अविभाज्य गोष्टी योग्य दिशेला ठेवल्यास कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही, असे वास्तुशास्त्रात सांगितले जाते. याशिवाय त्या गोष्टी योग्य पद्धतीने पाळल्या तर आपोआप घरात सुख, समृद्धी टिकून राहते, अशी मान्यता असल्याचे म्हटले जाते. वास्तुशास्त्रामध्ये घरामध्ये ठेवलेल्या छोट्या-छोट्या गोष्टींबाबतही अनेक उपाय आणि दिशा सांगण्यात आल्या आहेत. असेच काहीसे मेणबत्त्यांबाबतही सांगितले आहे.

Alum Cleaning Hacks
घरातील फरशी चकाचक करण्यासाठी तुरटी आहे अत्यंत फायदेशीर; जाणून घ्या सोप्या टिप्स
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Marathi actress Mukta Barve special post after appearing in Indrayani serial
‘इंद्रायणी’ मालिकेत झळकल्यानंतर मुक्ता बर्वेची खास पोस्ट, म्हणाली, “कितीतरी दिवसांनी…”
success story of Sindhu brothers who grows keshar with aeroponics method most expensive spice sells it for lakhs
भावांनी घरातच केली केशरची शेती, प्रगत तंत्रज्ञान वापरून मातीशिवाय हवेत वाढतात झाडे, वाचा त्यांचा प्रेरणादायी प्रवास
soil making for plants in glass pot
काचपात्रातील बागेसाठी माती तयार करताना…
Pune Burglary attempted, Sadashiv Peth Burglary,
पुणे : सदाशिव पेठेत भरदिवसा घरफोडीचा प्रयत्न, महिलेला धक्का देऊन चोरटा पसार
loksatta satire article sujay vikhe patil
उलटा चष्म: पातेले कलंडलेच..
Kitchen jugad video orange peel and milk scrub for tanning skin
Kitchen Jugaad: दुधात संत्र्याची साल टाकताच कमाल झाली; Video पाहाल तर दररोज कराल हा उपाय

चिनी वास्तूमध्ये मेणबत्त्यांचे विशेष महत्त्व आहे. आजकाल बाजारात वेगवेगळ्या डिझाईन्सच्या अनेक प्रकारच्या मेणबत्त्या उपलब्ध आहेत. घरात वेगवेगळ्या स्टाइलमध्ये मांडलेल्या वेगवेगळ्या रंगांच्या मेणबत्त्या खूप सुंदर दिसतात. हे घरातील वातावरण सुधारते आणि आनंददायी बनवते. मात्र, घरात मेणबत्त्या एका विशिष्ट जागी लावण्याची पद्धत असते. योग्य दिशेला मेणबत्या लावल्यास, तुमच्या घरात सुख समृद्धी नांदते. अधिक धनवृद्धी होऊ शकते, असे वास्तुशास्त्रात सांगण्यात आले आहे.

(हे ही वाचा: Vastu Tips: घराच्या मुख्य दारावर शुभ-लाभ का लिहितात? स्वस्तिक काढल्याने मिळते सुख-समृद्धी? शास्त्र काय सांगते…)

मेणबत्तीचा वापर आपण सहसा लाईट गेल्यानंतर किंवा कँडल्स लाईट डिनरसाठी करतो. पण या मेणबत्तीचा वापर आपल्या वास्तूसाठी फार महत्त्वाचे आहे. त्यामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. मेणबत्त्या घरात लावल्याने घर उजळून निघते. मेणबत्त्या लावल्याने घरात ऊर्जेचा समतोल राहतो. मेणबत्या नकारात्मक ऊर्जा काढून टाकतात आणि तिचे सकारात्मक ऊर्जेमध्ये रूपांतर करतात. असे म्हणतात की, मेणबत्त्यांमधून निघणारी ऊर्जा नकारात्मक ऊर्जा नष्ट करते, ज्यामुळे सकारात्मक ऊर्जा आपोआप वाढते. त्यामुळे घरात मेणबत्या लावणं कधीही शुभ मानलं जातं.

मात्र, मेणबत्या विशिष्ट जागी लावण्याची पद्धत असते. मेणबत्त्या ठेवण्यासाठी जागा निवडताना विशेष काळजी घेतली पाहिजे. घराच्या पूर्व, उत्तर-पूर्व आणि दक्षिण दिशेला मेणबत्त्या पेटवल्याने घरात सुख-समृद्धी येते, असे वास्तुशास्त्रात सांगण्यात आले आहे.

(टीप- सदर लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे)