Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा खूप महत्त्वाचा असतो. त्यामुळे वास्तुशास्त्रामध्ये मुख्य दरवाजाशी संबंधित अनेक महत्त्वाचे नियम सांगण्यात आले आहेत. त्यामुळे लोकं आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर शुभ वस्तू लावतात. या गोष्टी लावल्याने घरात राहणाऱ्या लोकांवर सकारात्मक प्रभाव पडतो, असे मानले जाते. वास्तुशास्त्रामध्ये, घरामध्ये सुख-समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. असे मानले जाते की, या उपायांचा अवलंब केल्याने कुटुंबातील लोकांची प्रगती होते आणि त्यांच्यामध्ये प्रेम टिकून राहते. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हिंदू धर्म शास्त्रामध्ये, अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत ज्याद्वारे व्यक्ती प्रगती प्राप्त करू शकते. शुभ चिन्ह त्यापैकी एक आहे. शुभ चिन्ह म्हणजे शुभ-लाभ आणि स्वस्तिक. तुम्ही अनेकदा घरांच्या मुख्य दरवाजावर शुभ आणि स्वस्तिक चिन्ह पाहिले असेल. घराच्या मुख्यदारावर ‘स्वस्तिक’ मुख्यदाराच्या मध्यभागी आणि शुभ-लाभ डाव्या उजव्या बाजूस लिहितात. घर आणि मंदिरात केल्या जाणाऱ्या पूजेमध्ये सर्वात आधी स्वस्तिक चिन्ह बनवले जाते आणि शुभ-लाभ लिहिले जातात. ही परंपरा अनेक शतकांपासून चालत आलेली आहे.

(हे ही वाचा: Vastu Tips: तुळशीला जल अर्पण करताना कोणत्या ७ चुका करु नये? शास्त्रात काय सांगितलंय पहा जरा )

प्रत्येक मंगल कार्याप्रसंगी स्वस्तिकासोबत शुभ-लाभ लिहिण्याची फार जुनी परंपरा आहे. उजव्या आणि डाव्या बाजूला हळद कुंकूवाने शुभ-लाभ लिहिले जाते. शास्त्रानुसार, शुभ आणि लाभ हे गणपतीची दोन मुले आहेत. हिंदू धर्मग्रंथांमध्ये श्रीगणेशाला प्रथम पूज्य मानले जाते आणि श्रीगणेशाचे अपत्य हे शुभ व लाभदायक मानले जाते. घरात सुख आणि समृद्धी कायम राहण्यासाठी घराच्या मुख्य प्रवेशदारावर शुभ-लाभ लिहितात.

हिंदू धर्मात अशी श्रद्धा आहे की, शुभ लाभासाठी घराच्या मुख्य दरवाजावर स्वस्तिक लिहिल्यास घरात सुख-समृद्धी राहते आणि श्रीगणेशाचा आशीर्वाद कायम राहतो. याशिवाय घरात कधीही धन आणि धान्याची कमतरता भासत नाही. यासोबतच घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर स्वस्तिक असलेले शुभ चिन्ह श्रीगणेशाचे अस्तित्त्व निर्माण करते. त्यामुळे बाप्पाचाही आशीर्वाद प्राप्त होतो. याशिवाय ही चिन्हे वास्तुबाहेरील नकारात्मक ऊर्जा वास्तुबाहेर रोखून धरतात. हिंदू धर्मात स्वस्तिक चिन्ह अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. मुख्य दरवाजावर लावल्याने तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा तर प्रवेश करतेच, बरोबरीने तुमच्या घरात सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य येते, असे मानले जाते. 

(येथे दिलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vastu shastra tips why are shubh and labh written on main entrance door in india pdb
Show comments