Vastu Shastra : मानवी जीवनात वास्तुशास्त्राचे विशेष महत्त्व आहे. कारण जर आपले घर वास्तुनुसार बांधले नाही तर त्यामुळे जीवनात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. शिवाय आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आज आपण वास्तुशास्त्रानुसार घरातील बाथरूम नक्की कोणत्या दिशेला असावे याविषयी जाणून घेणार आहोत. कारण जर तुमचे बाथरूम बेडरूमला अटॅच्ड असेल तर तुमच्या आयुष्यात आर्थिक संकटे येऊ शकतात. त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार, बेडरूमधील बाथरूम नेमकं कोणत्या दिशेला असावं याविषयीचे नियम जाणून घेऊ…
अटॅच्ड बाथरूमची स्वच्छता
वास्तुशास्त्रानुसार, जर तुमच्या घरात बेडरूमला बाथरूम अटॅच्ड असेल तर ते अस्वच्छ ठेवू नका. वेळोवेळी ते स्वच्छ करत रहा. कारण जर तुम्ही असे नाही केले तर तुमच्या घरात नकारात्मकता कायम राहील. तसेच कुटुंबातील सदस्यांना झोपेची समस्या जाणवू शकते. एवढेच नाही तर पती-पत्नीमधील नाते बिघडू शकते.
देखभालीची घ्या विशेष काळजी
जर तुमच्या घरातही अटॅच्ड बाथरूम असेल तर तुम्हाला त्याच्या देखभालीकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. म्हणजे टॉयलेट सीट तुटलेली किंवा घाणेरडी नसावी. तसेच, बाथरूमच्या नळाला गळती नसावी. बाथरूमचा दरवाजाही तुटलेला नसावा. जर असे असेल तर तुमच्या घरात वास्तुदोष असू शकतो. तसेच जीवनात नकारात्मकता येऊ शकते.
बाथरूम नेहमी ‘या’ दिशेने असावे
वास्तुशास्त्रानुसार, जर तुमचे बाथरूम दक्षिण किंवा ईशान्य कोपऱ्यात असेल तर ते वास्तुशास्त्रानुसार चुकीचे आहे. जर असे झाले तर जीवनात गरिबी येऊ शकते, तसेच वास्तुदोष उद्भवू शकतात. घराच्या पूर्वेला बाथरूम असणे चांगले मानले जाते. असे केल्याने घरात सुख-समृद्धी नांदू शकते.
वैवाहिक जीवनात निर्माण होतील समस्या
जर तुमच्या बेडरूमला बाथरूम अटॅच्ड असेल तर तुम्ही बाथरूमकडे पाय ठेवून झोपू नये. कारण असे केल्याने वैवाहिक जीवनात समस्या निर्माण होऊ शकतात. तसेच, पती-पत्नीमध्ये छोट्या-छोट्या कारणांवरून वाद होऊ शकतात. झोपण्यासाठी सर्वात योग्य दिशा म्हणजे डोकं दक्षिणेकडे आणि पाय उत्तरेकडे असावेत.