Vastu Tips For Home : वास्तुशास्त्रानुसार घरातील प्रत्येक गोष्ट बनवताना दिशानिर्देशकांवर विशेष लक्ष दिले जाते. म्हणजे घरामध्ये कोणत्या दिशेला किचन असावे, बेडरुम, बाथरुम ते मेन गेट नेमकं कोणत्या दिशेला असावे याची माहिती घेतली जाते. कारण वास्तुशास्त्रानुसार जर घरातील प्रत्येक गोष्ट योग्य दिशेला असेल तर घरात सकारात्मक आणि आनंदाचे वातावरण निर्माण होते.

तसेच घरातील प्रत्येक रुम जर योग्य दिशेने असल्यास कुटुंबातील सदस्यांच्या प्रगती आणि आरोग्यावर त्याचा सकारात्मक परिणाम होतो, त्यामुळे घरातील कोणत्या दिशेला नेमक्या कोणत्या गोष्टी असल्या पाहिजेत जाणून घेऊ…

vastu shastraजाणून घेऊ ( (Vastushastra Vastu Tips)

पूर्व दिशा

सूर्य याच दिशेने उगवतो. त्यामुळे येथून अधिक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. यामुळे घराचा मुख्य दरवाजा, देवघर किंवा खिडकी या दिशेने असणे फायदेशीर ठरू शकते.

पश्चिम दिशा

पश्चिम दिशेला किचन किंवा टॉयलेट ठेवता येईल, पण या दोन्ही गोष्टी जवळ नसाव्यात.

उत्तर दिशा

तुम्ही घराचे मेन गेट, बाल्कनी, वॉश बेसिन या दिशेने बनवू शकता.

दक्षिण दिशा

घरातील दक्षिण दिशेला तुम्ही जड वस्तू म्हणजे कपाट, फ्रीज, पलंग, मोठा बेड आदी वस्तू ठेऊ शकता. पण, या दिशेला कधीही वॉशरुम, मुख्य दरवाजाच्या बाजूने खिडक्या करू नका.

ईशान्य दिशा

या दिशेला पाण्याचे स्थान म्हणतात, त्यामुळे घराच्या मेन गेट व्यतिरिक्त या दिशेल तुम्ही देवघर तयार करू शकता. याशिवाय तुम्ही स्विमिंग पूलदेखील या दिशेने बांधू शकता.

उत्तर पश्चिम दिशा

या दिशेला तुम्ही बेडरुम बांधू शकता, जे तुमच्यासाठी शुभ राहील.

हेही वाचा – Vastu Tips : घरात ‘या’ दिशेला चुकूनही लावू नका घड्याळ अन् आरसा, करावा लागेल भयंकर संकटाचा सामना! वास्तु शास्त्र काय सांगते वाचा

आग्नेय दिशा

या दिशेला अग्नि तत्वाची दिशा म्हणतात, त्यामुळे गॅस शेगडी, बॉयलर, ट्रान्सफॉर्मर इत्यादी आगीशी संबंधित गोष्टी या दिशेने असाव्यात.

दक्षिण पश्चिम दिशा

या दिशेला घराच्या प्रमुखाची रुम असावी. याशिवाय पैसे, सोन्याचे दागिने यासह इत्यादी गोष्टी तुम्ही या दिशेने ठेऊ शकता. या दिशेला दरवाजे आणि खिडक्या बांधू नका.

(टीप – वरील लेख हा उपलब्ध माहितीवर आधारित आहे.)

(

Story img Loader