प्रत्येकाला आपले घर चांगले दिसावे असे वाटतं असते. आपले घर चांगले दिसावे यासाठी लोकं घरात ठेवलेली प्रत्येक वस्तू घराच्या भिंतीच्या रंगानुसार खरेदी करतात. वस्तू खरेदी केल्यानंतर घराची सजावट केली जाते. प्रत्येकाला आपले घर आकर्षक दिसावे असे वाटते. घराला सुंदर बनवण्यासाठी विविध प्रकारचे पडदे वापरले जातात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वास्तुशास्त्रानुसार पडद्यामुळे आपल्या अनेक समस्या दूर होतात असे सांगितले आहे. अनेकजण घराच्या भिंतीच्या रंगानुसार पडदे लावतात, तर अनेकजण वास्तुशास्त्रानुसार घरात पडदे लावतात. वास्तुशास्त्रात पडद्याचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. वास्तुशास्त्रानुसार पडदे लावणे शुभ मानले जाते.

वास्तुशास्त्रात असे सांगितले आहे की तुम्ही तुमच्या घराच्या दिशेनुसार पडद्यांचा रंग बदलला पाहिजे. जर एखाद्याच्या कुटुंबात भांडण आणि कलह होत असेल किंवा घरातील लोकांमध्ये वाद होत असतील तर घराच्या दक्षिण दिशेला लाल पडदा लावणे शुभ मानले जाते. घराच्या दक्षिण दिशेला लाल पडदे लावल्याने घरातील सदस्यांचे परस्पर प्रेम वाढते आणि घरात शांती नांदते.

प्रत्येकजण कष्ट करत असतो. तर त्यातील काही लोकांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळत नाही असे अनेकवेळा दिसून येते. पुन्हा पुन्हा मेहनत करूनही अपयश येते. जर तुमच्यासोबत असे होत असेल तर घराच्या पश्चिम दिशेला पांढरे पडदे लावण्याचा सल्ला वास्तुशास्त्र देते. असे केल्यास तुमच्या त्रासातून आराम मिळतो.

जर तुम्ही कर्जबाजारी असाल आणि तुम्हाला पैशाची अडचण असेल तर घराच्या उत्तर दिशेला निळे पडदे लावावेत. असे केल्यावर त्याचा परिणाम काही दिवसातच दिसून येईल. दुसरीकडे, जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल आणि तुम्हाला नोकरी मिळत नसेल तर घराच्या पूर्व दिशेला हिरवे पडदे लावावेत. व्यवसायात नफा मिळवता येत नसला तरीही तेच करण्याचा सल्ला दिला जातो. हे सर्व उपाय केल्यास त्याचा परिणाम तुम्हाला लवकरच दिसून येईल.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vastu tips curtains according to the direction know which color curtain should be in which direction scsm