Vastu Tips : वास्तू शास्त्रामध्ये घराशी संबंधीत काही नियम सांगितले आहे. हे नियम पाळले की याचा सकारात्मक परिणाम घरातील लोकांवर होतो आणि जर घरात आपण एखादी वस्तू चुकीच्या दिशेने ठेवतो, तेव्हा याचे दुष्परिणामही दिसायला सुरुवात होतात. वास्तू शास्त्र सांगते की जर आपण घरात चुकीच्या दिशेन डस्टबिन ठेवली तर लक्ष्मी नाराज होऊ शकते ज्यामुळे आपली आर्थिक संकटे वाढू शकतात. घरात कोणत्या दिशेने डस्टबिन ठेवावी, जाणून घेऊ या.
चुकूनही घरात ‘या’ दिशेने ठेवू नका डस्टबिन
वास्तूशास्त्रानुसार, घरात डस्टबिन चुकूनही ईशान्य दिशेला ठेवू नये. जर तुम्ही ईशान्य दिशेला डस्टबिन ठेवत असाल तर घरातील लोकांच्या मानसिक आरोग्यावर याचा परिणाम होऊ शकतो.
वास्तूशास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे, जर तुम्ही डस्टबिन घरात आग्नेय दिशेने ठेवत असाल तर तुम्हाला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आर्थिक अडचणी उद्भवू शकतात.
वास्तू शास्त्र सांगते की घरात पूर्व आणि उत्तर दिशेला चुकूनही डस्टबिन ठेवू नये. यामुळे घरात नैराश्य पसरू शकते आणि कामात अडचणी निर्माण होऊ शकतात.
हेही वाचा : नवरा-बायकोचे नाते घट्ट कसे करावे? प्रत्येक जोडप्याने सकाळी उठल्यानंतर करावीत ‘ही’ पाच कामे
घरात ‘या’ दिशेने ठेवा डस्टबिन
वास्तूशास्त्रामध्ये घरात डस्टबिन ठेवण्याची योग्य दिशा सांगितली आहे. डस्टबिन नेहमी वावव्य आणि नैऋत्य दिशेने ठेवावी. नैऋत्य ही दिशा विसर्जनासाठी शुभ मानली जाते. त्यामुळे या दिशेने डस्टबिन ठेवणे, चांगले आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे डस्टबिन कधीही घराच्या बाहेर ठेवू नये तर घराच्या आत ठेवावी.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)