Vastu Tips For Bedroom and Kitchen: वास्तुशास्त्रामध्ये दिशांना महत्त्व खूप असते. असे म्हणतात की, दिशेनुसार घराचे निर्माण केले असेल तर घरात सकारात्मक उर्जेचा वास असतो. वास्तुशास्त्राचे कित्येक पैलू आपल्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणतात. लोक घरामध्ये वास्तू दोष एकदातरी आवर्जून तपासतात. कित्येकदा आपल्या छोट्या चुकांमुळे वास्तू दोष निर्माण होऊ शकतो. असे म्हणतात, बेडरूम व किचनमध्ये चूकनही काही गोष्टी करणे टाळले पाहिजे, ज्यामुळे वास्तू दोष निर्माण होऊ शकतो. चला तर जाणून घेऊ…
तुमच्या खोलीमध्ये करू नका या चुका
- वास्तूतज्ञांच्या मते घरातील काही लोकांना बेडवर जेवायला आवडते, रूममध्ये टीव्ही असल्यामुळे लोकांना याची सवय होते, जे पूर्णपणे चुकीचे आहे. वास्तुशास्त्रानुसार अंथरुणावर बसून अन्न खाल्ल्याने माता लक्ष्मीचा कोप होतो, त्यामुळे तुम्हाला घरात आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो.
- वास्तुशास्त्रानुसार अनेक वेळा आळशीपणामुळे आपण कॉफी, ज्यूस किंवा चहाचा उष्टा कप बेडवर किंवा बेडच्या शेजारील टेबलावर ठेवतो. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा पसरते.
- वास्तुशास्त्रानुसार कोणतीही वस्तू उशीखाली ठेवू नका. वास्तुशास्त्रानुसार, यामुळे जीवनात नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो आणि तुमच्या प्रगतीमध्ये अडथळा निर्माण होतो.
हेही वाचा – Sun Transit 2023: सूर्यदेव करणार कर्क राशीत प्रवेश, जाणून घ्या १२ राशींवर कसा होईल प्रभाव?
स्वयंपाकघरात करू नका या चुका
- वास्तूनुसार घराचे स्वयंपाकघर नेहमी दक्षिण-पूर्व दिशेला असावे. यासोबतच गॅस शेगडी, सिलिंडर, मायक्रोवेव्ह, ओव्हन आदी वस्तू स्वयंपाकघराच्या दक्षिण-पूर्व भागात ठेवाव्यात.
- वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघराचा वापर फक्त स्वयंपाकासाठीच करावा. स्वयंपाकघरात कधीही अन्न खाऊ नये, यामुळे स्वयंपाकघर उष्टे होते आणि माता लक्ष्मीचा कोप होतो.
- रात्रीच्या वेळी स्वयंपाकघरात उष्टी भांडी ठेवू नका. असे केल्याने अन्नपूर्णा देवी रागावते. स्वयंपाकघर व्यवस्थित स्वच्छ ठेवावे आणि रात्री भांडी धुवावीत.
- हे देखील लक्षात ठेवले पाहिजे की, स्वयंपाकघराच्या अगदी समोर बाथरूम कधीही बनवू नका. स्वयंपाकघर-बाथरूमच्या विरुद्ध वास्तू दोष निर्माण होऊन धनहानी होते.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित असून लोकसत्ता याची पुष्टी करत नाही)