वास्तूला आपल्या जीवनात खूप महत्त्वाचे स्थान आहे. घर आणि कामाची जागा वास्तुनुसार बनवली तर सुख-समृद्धी येते. दुसरीकडे वास्तूनुसार घर बांधले नाही तर त्या घरात नेहमी गरिबीचे वास्तव्य असते आणि तिथून माता लक्ष्मी निघून जाते, तर दुसरीकडे वास्तुदोषांमुळे माणसाला अनेक संकटांना सामोरे जावे लागते. वास्तुशास्त्रानुसार अशा गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत ज्यामुळे घरात आर्थिक अडथळे राहतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तुटलेल्या वस्तू घरात ठेवू नयेत

तुटलेल्या वस्तू कधीही घरात ठेवू नयेत. विशेषतः तुटलेल्या खुर्च्या किंवा टेबल. घरात अशा वस्तू ठेवल्याने आर्थिक चणचण भासते आणि कुटुंबातील सदस्यांच्या प्रगतीत अडथळा निर्माण होतो. सोफा कुठूनही तुटलेला नसावा हेही लक्षात ठेवा. तसे असल्यास, ते त्वरित दुरुस्त करा. यासोबतच घरातील बेडवर ठेवलेली चादर घाण किंवा फाटलेली नसावी.

घरामध्ये काटेरी झाडे लावू नका

घर सजवण्यासाठी कोणत्याही प्रकारची काटेरी झाडे ठेवू नका. वास्तुशास्त्रानुसार असे केल्याने कुटुंबातील सदस्यांमधील नात्यात तणाव राहतो. याशिवाय स्वयंपाकघरात झाडू, पादत्राणे आणि मॉप कधीही ठेवू नये, यामुळे घरात समृद्धी येत नाही. तसेच घरातील स्वयंपाकघरातील नळ कधीही गळू नये हे लक्षात ठेवा.

देवांची तुटलेली मूर्ति ठेवू नयेत.

यासोबतच देवाची विकृत आणि जुनी चित्रे कधीही घरात ठेवू नयेत. तसेच देवतांच्या खंडित मूर्तींमुळेही घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतात. यामुळे आर्थिक नुकसान होऊ शकते, असे मानले जाते की अनेकदा लोकं घरामध्ये रद्दी ठेवतात जी वास्तूनुसार पूर्णपणे चुकीची मानली जाते. कधीही न वापरलेल्या वस्तू घरात ठेवू नयेत.

घरात असे फोटो कधीच लावू नका

तुटलेल्या काचा, तुटलेल्या फ्रेम्स, सदोष इलेक्ट्रॉनिक वस्तू, तुटलेली भांडी, बंद घड्याळ, तुटलेली झाडू, दिवाळीत वापरलेले दिवे घरात ठेवू नयेत. असे केल्याने कुटुंबात समृद्धी येत नाही. घरामध्ये युद्ध किंवा युद्धाचे चित्र कधीही लावू नका हे लक्षात ठेवा. महाभारत युद्धाचे चित्र, ताजमहालचे चित्र, बुडत्या बोटीचे किंवा जहाजाचे चित्र, वन्य प्राणी, काटेरी झाडे यांचे फोटो कधीही लावू नका. वास्तुशास्त्रानुसार अशी चित्रे घरात लावल्याने घरातील सदस्यांवर वाईट परिणाम होतो.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vastu tips for money never keep this type of things at home otherwise you may face money problem in your life scsm