घरातील दरवाजापासून खिडक्यांपर्यंत अनेक वस्तू या लाकडाच्या असतात. त्यात काही घरांमध्ये सोफा, पलंग, टेबल, खुर्च्यादेखील लाकडापासून बनवून घेतलेल्या असतात. त्यामुळे प्रत्येकाच्या घरात नाही नाही म्हटले तरी एक तरी लाकडाची वस्तू असतेच. केवळ घरातील गरजांसाठीच नाही तर वास्तुशास्त्रातही लाकडी फर्निचरला विशेष महत्त्व आहे. या वस्तू एका विशिष्ट ठिकाणी ठेवल्यास घरात एक सकारात्मक ऊर्जा राहते. त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार लाकडी वस्तू कोणत्या दिशेने ठेवणे योग्य असते जाणून घेऊ …

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वास्तुशास्त्रानुसार लाकडी फर्निचर आग्नेय कोनात ठेवणे फायद्याचे आहे. लाकडी फर्निचर ठेवण्यासाठी आग्नेय कोन म्हणजेच दक्षिण-पूर्व दिशा निवडणे चांगले. या दिशेला लाकडी फर्निचर ठेवल्याने तुमच्या कुटुंबातील सदस्यांचा विकास होत राहतो. त्यामुळे तुमचा व्यवसायही वाढू शकतो. तसेच घरातील मोठ्या मुलीला याचा खूप फायदा होऊ शकतो. त्यांची प्रकृती उत्तम राहते.

तिने कोणताही व्यवसाय केला तर तशत्यात तिला खूप फायदा होताना दिसतो. तुम्ही हिरव्या रंगाचे लाकडी फर्निचर या दिशेला ठेवले किंवा फर्निचरवर कोणतीही हिरवी वस्तू ठेवली, तर ते तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरू शकते. तसेच आग्नेय कोनाव्यतिरिक्त आपण पूर्वेकडेही लाकडी फर्निचरदेखील ठेवू शकता; जर ते जास्त जड नसेल.

वास्तुशास्त्रानुसार घराच्या कोणत्याही खोलीत, ड्रॉईंग रूममध्ये किंवा इतर कोणत्याही ठिकाणी लाकडी फर्निचर ठेवण्यासाठी आग्नेय कोन म्हणजेच आग्नेय दिशा निवडणे चांगले. कारण ही दिशा लाकडाशी संबंधित आहे, त्यामुळे लाकडी फर्निचर आग्नेय कोनात ठेवल्यास त्या दिशेशी संबंधित घटकांचे शुभ परिणाम मिळतात.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vastu tips in marathi know the best direction for placing wooden furniture in house according to vastu shastra sjr