प्राचीन काळापासून चालत आलेल्या अनेक रूढी-परंपरा, पद्धती आजही प्रचलित आहेत, जे लोक आजही पाळतात. यापैकीच एक परंपरा चप्पल आणि शूज यांच्याशी संबंधित आहे. अनेकदा दिसून येते की, लोक घरात येण्यापूर्वी चप्पल किंवा शूज बाहेर काढतात. पण शूज आणि चप्पल घराबाहेर काढण्याचे फायदे तुम्हाला माहीत आहेत का? वास्तुशास्त्रानुसार, घराबाहेर चप्पल काढणे, हे आपल्या आरोग्यासाठी चांगले असते. वैज्ञानिक आणि धार्मिकदृष्ट्यादेखील चप्पल घराबाहेर काढणे आवश्यक आहे.

चप्पल घराबाहेर काढण्यामागे काय आहे कारण?

घराला आपण मंदिर आणि तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला आहे. आपण सर्व जण मंदिरात प्रवेश करताना चप्पल बाहेर काढूनच प्रवेश करतो. म्हणूनच असे म्हटले जाते की, घरात प्रवेश करताना चप्पल आणि शूज बाहेर काढूनच जावे. आपण सर्व ठिकाणी पायात चप्पल घालून फिरतो चपलेखाली घाण चिकटते. अशा परिस्थितीत तुम्ही तीच चप्पल घरात घेऊन गेलात तर घरात वेगवेगळ्या प्रकारचे जंतू, घाण येते आणि घरातील वातावरण अशुद्ध होते. यामुळेच शूज आणि चप्पल घराबाहेर काढण्यास सांगितले जाते.

काय आहे वैज्ञानिक कारण?

विज्ञानानुसार, बाहेरून येणारी घाण शूज किंवा चप्पलला चिकटते, त्यामुळे ती घालून घरात प्रवेश करू नये. यामुळे घरातील लोकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. जर तुम्हीही चप्पल आणि शूज घालून घरात जात नसाल तर ते तुमच्यासाठीच खूप चांगले ठरू शकते. कारण असे केल्याने बाहेरून येणारी नकारात्मक ऊर्जा घरामध्ये येत नाही आणि तुमच्या घरात आनंद टिकून राहू शकतो.