Why Vasubaras is celebrated: हिंदू धर्मामध्ये गाईला अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानले जाते. गाईला गोमाता म्हणजेच आई समजून तिचा सेवा केली जाते. असं म्हणतात की, गाईमध्ये ३३ कोटी देवता वास करतात. दिवाळीची खरी सुरुवात गाईची पूजा करून म्हणजेच वसुबारस या सणापासून होते. धनत्रयोदशीच्या आदल्या दिवशी म्हणजेच गोवत्स द्वादशीला हा सण साजरा केला जातो. यंदा २८ ऑक्टोबर रोजी वसुबारस साजरा केला जाईल.

वसुबारस शब्दाचा अर्थ काय?

हिंदू पंचांगानुसार वसुबारस हा सण अश्विन पक्षातील द्वादशी तिथीला साजरी केला जातो. या दिवशी घरोघरी गाईची आणि वासराची पूजा केली जाते. वसु म्हणजे गाय आणि बारस म्हणजे बारावा दिवस. त्यामुळे या दिवसाला वसुबारस, असं म्हटलं जातं. हा सण महाराष्ट्रासह भारतातील इतर काही राज्यांमध्येही साजरा केला जातो. या दिवशी घरातील विवाहित स्त्रिया कुटुंबाच्या आणि मुलांच्या कल्याणासाठी गाईची पूजा करतात. तिला नैवेद्य खाऊ घालतात. परंतु, हल्ली शहरात गाईच्या मूर्तीची पूजा केली जाते.

27th Rashibhavishya In Marathi Horoscope Today
27 October Horoscope : अचानक धनलाभ ते‌ वैवाहिक जीवनात गोडवा; मेष ते मीनपैकी कोणत्या राशींना कामात मिळेल भरभरुन यश? वाचा तुमचे भविष्य
26 October Daily Horoscope IN Marathi
Daily Horoscope, 26 October : आज मेष ते…
Ratan Tata Died at 86 in Marathi
Ratan Tata Death : उद्योगपती रतन टाटा यांचे निधन; ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर कबुली दिल्यावर अंकिताने सांगितला किस्सा, म्हणाली…
nitin Gadkari controversial statement
गडकरींच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे भाजपपुढे पेच, प्रचारात सहभागी करून घेण्याच्या प्रयत्नात अडचणी
Sachin Sawant Upset With Andheri West Seat
Sachin Sawant : वरुण सरदेसाईंना वांद्रे पूर्व मतदारसंघ दिल्याने काँग्रेसचे सचिन सावंत नाराज! रमेश चेन्निथलांना काय केली विनंती?
Narak Chaturdashi 2024 Date Confusion| Narak Chaturdashi 2024
Narak Chaturdashi 2024 : ३० की ३१ कधी साजरी केली जाईल नरक चतुर्दशी? यमदीपदान अन् अभ्यंग स्नानाचा शुभ मुहूर्त नेमका कधी?
24th October 2024 Horoscopes In Marathi
24 October Horoscope : गुरुपुष्यामृत योग कोणत्या राशींसाठी ठरणार भरभराटीचा? भाग्याची साथ ते कामात मिळेल भरपूर यश; वाचा तुमचे राशिभविष्य

वसुबारस पूजेचा शुभ मुहूर्त

वसुबारस तिथीची सुरुवात : सोमवार, २८ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ७ वाजून ५३ मिनिटांपासून

वसुबारस तिथी समाप्त : मंगळवार, २९ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ५ वाजून ०४ मिनिटांपर्यंत असेल.

वसुबारसची पूजा कशी करावी?

  • या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे.
  • स्वच्छ वस्त्र परिधान करून घराबाहेर गोपद्म रांगोळी काढावी.
  • तुमच्या घरी गाई आणि वासरू असेल, तर त्यांची पूजा करावी. परंतु, जर तुम्ही शहरी भागात राहत असाल, तर गाई आणि तिच्या वासराच्या मूर्ती किंवा फोटोची पूजा करावी.
  • गाईला निरांजनाने ओवाळून गाईला पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घालावा.

हेही वाचा: Narak Chaturdashi 2024 : ३० की ३१ कधी साजरी केली जाईल नरक चतुर्दशी? यमदीपदान अन् अभ्यंग स्नानाचा शुभ मुहूर्त नेमका कधी?

दरम्यान, पौराणिक मान्यतेनुसार समुद्रमंथनातून ज्यावेळी १४ रत्ने बाहेर पडली, त्यातून कामधेनूचीही उत्पत्ती झाली. त्यामुळेच गाईला हिंदू धर्मात विशेष स्थान आहे. गाईची सेवा केल्याने कुटुंबात सुख-समृद्धी नांदते.